Wednesday, 4 August 2021

नरवीरांची भूमी उमरठ येथे दरडग्रस्तांना मनसेची मदत !

नरवीरांची भूमी उमरठ येथे दरडग्रस्तांना मनसेची मदत !


मुंबई, शांत्ताराम गुडेकर :

छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू मावळे अशी ओळख असलेल्या नरवीर तानाजी मालुसरेंच्या उमरठ गावात जाऊन मनसे नेते अविनाश अभ्यंकर , मनकासेचे सरचिटणीस गजानन राणे, चिटणीस राज पार्टे, अभिनेत्री राधा सागर चिटणीस, आण्णासाहेब लोखंडे आदींनी भेट देऊन पाहणी केली. तालुक्यातील केवनाळे आणि गोवेळे सुतारवाडी येथे दरड कोसळून अनेकांचे हकनाक बळी गेले. तर अनेकांची घरे दरडीत गाढली गेली. महाडचे तळीये गाव मातून गाढुन गेलं. दुःखाची झळ पोहोचलेल्या या गावांना धीर मिळावा आणि पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी विश्वास मिळावा या हेतूने तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूरग्रस्तांना , दरडग्रस्तांना मदत करण्याचे केलेले आवाहन समोर ठेवून खोपड गावचे असलेले मनकासेचे चिटणीस राज पार्टे यांनी मनसेच्या वतीने गजानन राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेलारवाडी, ढवळे, बौद्धवाडी, खोपड, चादंके, श्रीरामाचे उमरठ, फौजदार वाडी, उमरठ, बोरज, बोरज मोहल्ला अशा १० गावांना जीवनावश्यक सामान वाटप करण्यात आले. तसेच जो पर्यंत दरडग्रस्त गावे खंबीरपणे उभे राहत नाही तोवर मनसे तुमच्या मदतीला धावून जाईल असे आश्वासन मनसे कडून देण्यात आले. यावेळी डी वाय कलेक्टर पद्मश्री बैनाडे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, उपचिटणीस सागर कुलकर्णी , पोलादपूर तालुका अध्यक्ष रुपेश सकपाळ, शहर अध्यक्ष दर्पण दरेकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...