Friday, 8 October 2021

**काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी राजेश घोलप यांची फेरनिवड **

**काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी  राजेश घोलप यांची फेरनिवड **


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : गुरूवार, दि.७ ॲाक्टोंबर २०२१ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रातील प्रदेश कार्यकारिणीची यादी जाहीर केली. त्यामध्ये मुरबाड तालुक्यांतील श्री.राजेश घोलप यांची काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी प्रातांध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या कार्यकारिणी मध्ये फेरनिवड झाली. श्री.घोलप यांनी जवळपास दोन दशक पक्षामध्ये युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी व ब्लॅाक कमिटीच्या ठाणे-पालघर जिल्हा कार्याध्यक्षपदी काम केलं असुन मागील कार्यकारिणी प्रदेश सचिव म्हणुन काम केलं होत. 

श्री.राजेश घोलप ह्यांची प्रदेश कार्यकरिणीवर नियुक्ती झाल्यामुळे मुरबाड तालुक्यांतील कार्यकर्त्यांना हक्काचे प्रतिनिधी मिळाल्याचे मत तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केले. तर कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या कठिण प्रसंगात सोबत उभे राहणारे नेतृत्व म्हणुन त्यांची ओळख असल्याचे मत सेवादलचे जिल्हाध्यक्ष नरेश मोरे यांनी मत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...