माजी नगरसेविका वनिता वागस्कर यांची मनसे महिला शहराध्यक्षपदी नियुक्ती !!
पुणे : - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यातील महिला संघटनेमध्ये मोठे बदल केले आहे. विद्यमान महिला अध्यक्ष अॅड. रुपाली पाटील याची राज्याच्या महिला उपाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी नगरसेविका वनिता वागस्कर यांच्यावर पुणे शहर अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे शहर महिला सेनेच्या नवीन कार्यकारणी घोषणा केली यामध्ये प्रामुख्याने वनिता वागस्कर याची पुणे शहर अध्यक्षपदी व उपशहर अध्यक्षपदी अस्मिता शिंदे, जयश्री पाथरकर, पद्मिनी साठे यांची निवड करण्यात आली आहे.
या सर्वांना निवडीची पत्र राज ठाकरे यांनी दिले. यावेळी मनसे नेते अनिल शिदोरे, राजेंद्र वागस्कर, शहर अध्यक्ष वसंत मोरे , राज्य सरचिटणीस, राज्य उपाध्यक्ष, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, उपशहर अध्यक्ष,विभाग अध्यक्ष, मनसे पुणे शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी महिला संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने केलेल्या या नेमणुका महत्वाच्या मानण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment