Sunday, 10 October 2021

बोरघर हवेली स्कूलच्या "चेअरमन पदी शेकापचे दिपकशेठ रसाळ" तर 'उप चेअरमन पदी कानुशेठ विचारे' यांची बिनविरोध निवड !!

बोरघर हवेली स्कूलच्या "चेअरमन पदी शेकापचे दिपकशेठ रसाळ" तर 'उप चेअरमन पदी कानुशेठ विचारे' यांची बिनविरोध निवड !!


       बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तळा तालुका जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ बोरघर हवेली स्कुलच्या चेअरमन पदी शेतकरी कामगार पक्षाचे माजी तालुका चिटणीस दिपक शेठ रसाळ तर उप चेअरमन पदी शेतकरी कामगार पक्षांचे जेष्ठ नेते कानुशेठ विचारे याची बिन विरोध निवड झाली. 
       तळा तालुका जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ बोरघर हवेली ता तळा जिल्हा रायगड नविन कमिटी 2021,ते 2024 चेअरमन श्री दिपकशेठ रसाळ उप चेअरमन कानूशेठ विचारे, उप अध्यक्ष मनोहर करण, सरचिटणीस मनोहर काप, सहचिव नाना साहेब दळवी, खजिनदार पांडुरंग माळी, सदस्य अनंत माळी, सदस्य यशवंत मोड, सदस्य नरेंद्र घाडगे, सदस्य लक्षीन खांडेकर, सदस्य कृष्णा जाधव, सदस्य विलास कदम, सदस्य परशुराम वारंडे या सर्व नवनिर्वाचित कमिटीचे सत्कार तळा ता शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आले. 
       या प्रसंगी उपस्थित शे का प ता चिटणीस श्री धनराज गायकवाड जेष्ठ नेते गोविंद शेठ भोईर, जेष्ठ सलागार गंगाराम साळवी, माणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य महेश सुर्वे, खरेदी विक्री संघ माणगावचे सभापती निलेशजी थोरे, आर डी सी बँक संचालक ज्ञानेश्वर भोईर, तळा नगरपंचायतचे युवा नेते लहुशेठ चव्हाण, पिटसई ग्रामपंचायत सदस्य दिलीप लोखंडे, नरेश मोरे, महादेव जगताप, युवा नेते विपूल शेठ उभारे यांनी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले त्यांना पुढील वाटचाली करिता हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...