पेट्रोलनंतर आता डिझेल शंभरीपार !! महागाईचा मोठा भडका !!
इंधन दरवाढीचा भडका कायम दिसून येत आहे. पेट्रोलनंतर डिझेलचीही आता शंभरी पार झाले आहे. मुंबईत डिझेल प्रतिलिटर 100.29 रुपयांवर पोहोचले आहे. डिझेलच्या किंमतीत 37 पैशांची वाढ झाली तर पेट्रोल दरात 29 पैसे वाढ झाली असून, 109.83 रुपयांवर पेट्रोल प्रतिलिटर पोहोचले आहे.
डिझेलमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ही वाढ आता शंभरीपार झाली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने डिझेलचे दर वाढत असून आता पहिल्यांदाच पेट्रोलच्या दरात डिझेल मिळणार आहे. सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलचे दर वाढवले आहेत. सध्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर हे सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत

No comments:
Post a Comment