Sunday, 23 January 2022

नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन !!

नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन !!


कल्याण, हेमंत रोकडे : नेताजी सुभाषचंद्र बोस  व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती  दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात आज त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या समयी  महापालिका सचिव व माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी  वर्ग यांनी देखील त्यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करुन अभिवादन केले. 


तद्नंतर सुभाष चौक, कल्याण पश्चिम येथे असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व महापालिका सचिव तथा विभागप्रमुख, माहिती व जनसंपर्क संजय जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कल्याण पश्चिमेतील, प्रबोधनकार ठाकरे सरोवर येथील  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपआयुक्त, घकव्य- रामदास कोकरे व महापालिका सचिव तथा विभागप्रमुख, माहिती व जनसंपर्क संजय जाधव यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...