Friday, 21 January 2022

मुरबाडच्या कन्येचे सुयश, जवाहरलाल नेहरु सेंटर बँगलोर येथे शास्त्रज्ञ पदावर कार्यरत !!

मुरबाडच्या कन्येचे सुयश, जवाहरलाल नेहरु सेंटर बँगलोर येथे शास्त्रज्ञ पदावर कार्यरत !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
                   तालुक्यातील टोकावडे सारख्या ग्रामिण भागातील कन्या डाॅ.दीशा रमेश भांगे हीने माडर्न काॅलेज पुणे येथून बीटेक, आय आय टी पवई येथून एमटेक, व पीजीडीईएम लंडन युनिव्हरसिटी येथून पूर्ण करुन , इंडियन रिसर्च इन्स्टिट्यूट बेंगलोर फेलोशिप मिळवली आहे.
         मुरबाडच्या टोकावडे गावचे रहिवासी भारतिय कम्युनिष्ट पक्षाचे तत्कालिन चिटणिस कै. काॅम्रेड रमेश भांगे यांची कन्या व टोकावडे गावचे माजी सरपंच पञकार राजेश भांगे यांची पुतणी, युवा सामाजिक कार्यकर्ता महेश भांगे व न्यूज रिपोर्टर बाळा भांगे यांची बहीण डॉ. दिशा रमेश भांगे हिने अथक परिश्रम करुन  माॕडर्न काॕलेज पुणे येथून बीटेक, आय आय टी पवई  येथून एमटेक व पीजीडीईएम ईन लंडन युनिव्हर्सिटी येथून पुर्ण करुन इंडियन रिसर्च इन्स्टिट्यूट बेंगलोरची फिलोशिप मिळवली आहे.
     सध्या जवाहरलाल नेहरु सेंटर बँगलोर येथे शास्ञज्ञ (scientist) पदावर कार्यरत असून HIV एडस् या आजारावर विविध देशामध्ये अध्ययन करुन हा विषाणू जगभर कसा पसरला यावर शोधप्रबंध लिहला आहे. ती काही दिवसांत मायदेशी परतणार असुन या, गुणवंत डाॕ. दिशा रमेश भांगे हीचे कुणबी समाज संघटना मुरबाड व ग्रामस्थ मंडळ टोकावडे यांच्यावतीने सत्कार कार्यक्रम आयोजित केला आहे. तीच्या या यशाबद्दल तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...