एक हात मदतीचा.....
चिल्ड्रर्न्स हेल्प ॲन्ड हेल्पेज फाउंडेशन च्या माध्यमातून स्वीट होम ओल्डेज. कोपरखैरणे आणि रस्त्यावरील राहणारे बेवारस गरिबांना एक ब्लॅंकेट दान मोहीम राबवले, वृद्धाश्रम वंचितांना उच्च दर्जाचे उबदार ब्लँकेट आणि नाश्ता पुरवला. वृद्ध आई बाबांबरोबर त्याचे दुखः अडचणी सामजून घेतल्या. बऱ्याचशा करमणूक करून घेण्यात आल्या जसे की डान्स, संगित, जोक्स. ते आत्यंत आनंदी होते.
संयुक्त कुटुंब पद्धती घरात खूप माणसं असतात माणसे असत. वृद्ध, अपंग, आजारी माणसांची काळजी घेत. कुटुंब एक अशी भावना असे, त्यामुळे या गोष्टी जिव्हाळ्याने होत. आज-काल कुटुंबात मोजकीच माणसे असतात. घरातील स्त्री पण नोकरीसाठी बाहेर पडते, त्याचबरोबर पाळणाघर व तयार आहात अशा सोयींमुळे वडीलधाऱ्या माणसांची, त्यांच्या अनुभवांची गरज उरत नाही. सध्या सर्व क्षेत्रात जग इतक्या गतीने पुढे जात आहे की, घरातील माणसे एकमेकांची साधी चौकशी करायला वेळ मिळत नाही. मग लहानशा घरात अडगळ होते. या गतिमान जीवनात त्यांच्यासाठी देण्यास तरुणांकडे वेळ नसतो. मग वृद्धाश्रमांत रस्ता दाखवला जातो.
थंडीच्या मोसमात गरजूंना उबदार कपडे देण्यापेक्षा चांगली भेट दुसरी नाही. लाखो बेघरांना हिवाळ्यात कटुता येते आणि त्यांना गंभीर आजार होण्याचा धोका असतो. हवेतील प्रदूषणाच्या पातळीत झालेली वाढ आणि या वर्षी हिवाळा लवकर सुरू झाल्याने त्यांना असुरक्षित बनवले आहे, परंतु त्याच वेळी गरजूंना ब्लँकेट दान करून मानवतेची सेवा करण्याची कार्य चिल्ड्रेन्स हेल्प अँड हेल्पेज फाउंडेशन करत आहे. श्री अश्विन पाटणे व श्रावणी खराडे. (संस्थापक) यांचे ब्रीद वाक्य म्हणजे एखाद्याचे प्राण वाचवण्यापेक्षा मोठे समाधान असू शकत नाही.

No comments:
Post a Comment