Wednesday, 9 February 2022

आमदार नितेश राणेंना दिलासा; सिंधुदुर्ग न्यायालयाकडून जामीन मंजूर !!

आमदार नितेश राणेंना दिलासा; सिंधुदुर्ग न्यायालयाकडून जामीन मंजूर !!


भिवंडी, दिं,9, अरुण पाटील (कोपर) :                                  शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी  आमदार नितेश राणे  आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. संतोष परब यांच्यावर कणकवलीमध्ये हल्ला झाला होता. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या नितेश राणे यांना न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे.
                 आमदार नितेश राणे आणि राकेश परब यांना शुक्रवारी न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर त्यांचे वकील संग्राम देसाई यांनी तात्काळ जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने अर्ज दाखल करून घेतल्यानंतर वकील संग्राम देसाई यांनी आपली बाजू मांडली होती. त्यावर न्यायालयाने शनिवारी दुपारी यावर सुनावणी घेऊन निर्णय देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार आमदार राणेंचे वकील सतीश मानेशिंदे, संग्राम देसाई शनिवारी दुपारी न्यायालयात हजर झाले होते.
                    परंतु या प्रकरणी शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ई-मेलद्वारे अर्ज करीत बचाव पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात जो अर्ज दाखल केलेला आहे. त्या अर्जावर या न्यायालयात ही सुनावणी न घेता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात घेण्याची मागणी केली होती. परंतु सरकारी वकील घरत यांनी केलेल्या अर्जावर स्वाक्षरी नव्हती. तो विहित नमुन्यात नव्हता.
             त्यामुळे हा अर्ज फेटाळण्याची मागणी आ. राणे यांच्या वकिलांनी केली. त्यानंतर सायंकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज परिपूर्ण करण्यास मुदत देण्यात आली होती. तरीही वकील घरत यांनी त्रुटी दूर केल्या नाहीत. त्यानंतर हा अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात देण्यात आला. यावेळी या न्यायालयाने जामीन अर्जावर सोमवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होईल. तसेच विशेष सरकारी वकिलांनी दिलेल्या अर्जातील त्रुटी दूर करण्यास सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ दिला होता.
               दरम्यान गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले या पार्श्वभूमीवर राज्यात दुखवटा जाहीर करण्यात आला. सोमवारी सार्वजनिक सुट्टी राज्य सरकारने जाहीर केली. त्यामुळे ही सुनावणी मंगळवारी घेण्यात आली. असून, त्यादिवशी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाला होता. तर आज (9 फेब्रुवारी) रोजी न्यायालयाने नितेश राणे यांना जामीन मंजूर केला आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...