Saturday, 5 February 2022

कल्याण पूर्वच्या साई शाळेवर कब्जा करणाऱ्या गिरी बाबूला अटक !! "अटकेनंतर साई शाळेचे प्रकरण तापले"

कल्याण पूर्वच्या साई शाळेवर कब्जा करणाऱ्या गिरी बाबूला अटक !!

"अटकेनंतर साई शाळेचे प्रकरण तापले"


कल्याण, बातमीदार : कल्याण पूर्वेतील वादग्रस्त साई इंग्लिश स्कूलवर जबरदस्तीने कब्जा करणाऱ्या पती-पत्नी गिरी बाबू आणि स्वर्णलक्ष्मी गिरी बाबू या दोघांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.


शाळेचे अध्यक्ष रामचंद्रमूर्ती यांच्या निधनानंतर शाळेच्या मालमत्तेवरून वाद सुरू झाला होता. दिवंगत रामचंद्रमूर्ती यांच्या पत्नी मैथिली मूर्ती यांनी आरोप केला आहे की, लॉकडाऊनमुळे शाळा बंद असताना गिरी बाबू नावाच्या व्यक्तीने याचाच फायदा घेऊन जबरदस्तीने आणि दादागिरी करून शाळेचा ताबा घेतला आणि शाळेची आवश्यक कागदपत्रेही बळकावली. 


स्वतःला शाळेचे विश्वस्त म्हणून घोषित करून गिरी बाबूंनी विद्यार्थ्यांकडून फीही वसूल करत होता. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी मैथिली मूर्ती यांच्या तक्रारीवरून काही महिन्यांपूर्वी गिरी बाबू आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता, मात्र बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर आरोपी पोलिसांच्या हाती लागला. कोळसेवाडीचे प्रभारी बशीर शेख व त्यांच्या पथकाने साई इंग्लिश स्कूलवर जबरदस्तीने कब्जा केल्याप्रकरणी गिरी बाबू व त्यांच्या पत्नीला अटक करून न्यायालयात हजर केले. त्याचवेळी शाळेच्या शिक्षिका मैथिली मूर्ती आणि त्यांची मुलगी श्रीलक्ष्मी मूर्ती यांनी शाळेच्या बाहेर बसून आरोपींवर कडक कारवाई  करण्यात यावी यासाठी आमरण उपोषण चालू केले असून त्याचा दुसरा दिवस आहे... या आमरण उपोषणाला शाळेतील पालकांचाही मोठा प्रतिसाद भेटत आहे...


गिरी बापू ने केलेल्या भ्रष्टाचार दादागिरी आणि शाळा वर मालकीहक्क सांगणे.. या त्याच्या जाचाला कंटाळून आम्ही उपोषण करत असून गिरी बाबुला जास्तीत जास्त ससा आणि कडक कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे अशी शाळेच्या मैथिली मूर्ती यांनी बोलताना सांगितले...


No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...