Monday, 7 February 2022

मनसुख हिरेन याच्या हत्ते नंतर माझ्या हत्तेचा कट ठाकरे सरकार रचत आहे --किरीट सोमय्या

मनसुख हिरेन याच्या हत्ते नंतर माझ्या हत्तेचा कट ठाकरे सरकार रचत आहे --किरीट सोमय्या


भिवंडी, दिं,७, अरुण पाटील (कोपर) :
             किरीट सोमय्या आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाल्यानं सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसैनिकांमध्ये आणि किरीट सोमय्यांमध्ये झालेल्या वादात किरीट सोमय्या पायरीवरून पडले. किरीट सोमय्या काही प्रमाणात जखमी देखील झाले आहेत. त्यातच आता किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.
              मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर माझ्या हत्येचा कट ठाकरे सरकार रचत आहे, असा धक्कादायक आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. मला शारिरीक इजा फार झालेली नाही. पण, उद्धव ठाकरे आणि शिवसेना अशाप्रकारे कट कारस्थान करतंआहे . सर्व व्हिडिओ पाहिल्या नंतर आणि सीआयएसएफच्या अहवालातून हेच सिद्ध होत आहे की, पुणे पोलीस, महापालिकेची काही कर्मचारी आणि शिवसेना हायकमांडने मिळून हा कट रचला होता, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
            किरीट सोमय्या दोन तीन महिने उठला नाही पाहिजे, असा मार देण्याचा कट होता, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसेच गेल्या 15 दिवसां पासून उद्धव ठाकरे प्रचंड अस्वस्थ आहेत. कारण की, संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांचे सगळे पुरावे सापडले आहेत. संजय राऊत, अनिल परब, ठाकरे परिवार आणि रश्मी ठाकरे यांच्या भावाचा समावेश आहे, असा घणाघाती आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
               दरम्यान, किरीट सोमय्या शिवसैनिकांच्या बाचाबाचीमध्ये काही प्रमाणात जखमी झाल्याने किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. स्थानिक पोलीस नाही तर मुख्यमंत्री कार्यालय यापाठीमागे होतं. अनिल परब आणि पाटणकर  यांना वाचवण्यासाठी किरीट सोमय्याला दोन चार महिने शांत करण्याचा कट होता, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...