मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांची आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनास भेट !!
मुंबई, संदीप शेंडगे - आझाद मैदानावर सुरू असलेल्या १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतरांना जुने पेन्शन लागू करावी म्हणून अघोषित शाळांना घोषित करून अनुदान मिळावे म्हणून सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आज आझाद मैदानावर भेट दिली सोबत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील संस्थाचालक श्री इकबालभाई परकार, अंबरनाथ शहर शिक्षक सेनेचे अध्यक्ष पंजाब बडगे, सचिव विजय राणे, प्रशांत तायडे, विशाल महाजन, जुन्या पेन्शन कोअर कमिटी सदस्य नामदेव फापाळे राज्यातून आलेले अनेक शिक्षक शिक्षकेतर बांधव उपस्थित होते.
डेंग्यू झाल्याने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याने बऱ्याच दिवसांपासून आझाद मैदानात येता आले नाही, परंतु या दोन्ही प्रश्नांसाठी तसेच अन्य प्रश्नांसाठी आदित्य ठाकरे यांची लवकरच भेट होणार आहे असे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले अशी माहिती विष्णू विशे संपर्कप्रमुख ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक सेना यांनी दिली.
.

No comments:
Post a Comment