Tuesday, 8 February 2022

उशीद ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेला गटविकास अधिका-याकडून महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपिल) नुसार नोटीस?

उशीद ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेला गटविकास अधिका-याकडून महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपिल) नुसार नोटीस?


कल्याण, (संजय कांबळे) : मोलमजुरी करणाऱ्या महिलेच्या घरी कोणीही नसताना ग्रामपंचायतीने नियमानुसार दिलेली घरपट्टी ग्रामसेविका श्रीमती माधुरी राठोड, शिपाई दिलीप शिंगे आणि संगणक आँपरेटर यांना घेऊन सदर महिलेच्या घरी जाऊन दिलेली घरपट्टी घेऊन जाणाऱ्या या ग्रामसेविकेला कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपिल) १९६७ मधील नियम ३चा भंग केल्या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली असून जो पर्यंत या ग्रामसेविकेवर कारवाई होत नाही, तोपर्यंतच आपला लढा सुरूच राहिल असे तक्रारदार महिला सुरेखा उघडे यांनी सांगितले आहे.


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मौजे उशीद या गावातील सुरेखा सागर उघडे यांनी त्यांच्या ताब्यातील व कब्जेवहिवाटीस झोपडीस घरपट्टी लावण्यासाठी ग्रामपंचायत उशीद यांच्या कडे अर्ज केला होता. सरपंच, सदस्यांनी मासिक मिंटिगमध्ये या अर्जावर विचारविनिमय करुन श्रीमती सुरेखा उघडे यांना मुलांच्या नावे म्हणजे सिंकदर सागर उघडे याला घरपट्टी देण्यात आली. परंतु २०/२५ दिवसानंतर ग्रामसेविका माधुरी राठोड यांना काहीतरी 'साक्षात्कार' झाला किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरुन एके दिवशी ग्रामपंचायत शिपाई दिलीप शिंगे व संकणक आँफरेटर यांना घेऊन  सुरेखा उघडे यांच्या घरी कोणी ही नसताना बेकायदेशीर, जबरदस्ती दादागिरी दाखवून लहान मुलगा सूरज उघडे याची फसवणूक करुन घरपट्टी घेऊन गेल्या, ग्रामसेविकेच्या या बेकायदेशीर कृत्यामुळे उघडे कुंटूबियांची समाजात व गावात मोठ्या प्रमाणात बदनामी, मानहानी, जबरधक्का व मानसिक त्रास झाला, होता, त्यामुळे त्यांनी कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या कडे रितसर तक्रार दाखल केली होती.


त्याची दखल घेऊन गटविकास अधिकारी यांनी संबंधित ग्रामसेविकेला मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५७ मधील तरतुदी नुसार नोटीस बजावली आहे. त्यामध्ये, तूमच्या अशा वर्तणुकीमुळे शासकीय कामात हलर्गजीपणा केला आहे, कामामध्ये कर्तव्य परायणता व सचोटी ठेवलेली दिसून येत नाही, तूम्ही महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपिल) १९६७ नियम ३चा भंग केला आहे, त्यामुळे तूमच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४ मधील नियम ४ नुसार योग्य ती प्रशासकीय कारवाई का करण्यात येवू नये, असे म्हटले आहे. त्यामुळे ग्रामसेवकामध्ये खळबळ उडाली आहे. तर आपल्याला जो पर्यंत न्याय मिळत नाही, ग्रामसेविका माधुरी राठोड यांच्या वर निंलबनाची कारवाई होत नाहीत तोपर्यंत माझा लढा सुरू राहील असे तक्रारदार महिला सुरेखा घगडे यांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...