Sunday, 6 February 2022

मुजोर रिक्षावाल्या विरोधात मराठी एकीकरण समितीच्या अध्यक्षांची तक्रार, पोलिसांनकडून कारवाई !!

मुजोर रिक्षावाल्या विरोधात मराठी एकीकरण समितीच्या अध्यक्षांची तक्रार, पोलिसांनकडून कारवाई !!


कल्याण, (संजय कांबळे) : रुग्णवाहिकेला अडथळा निर्माण करणाऱ्या मुजोर रिक्षावाल्याला धडा शिकवण्यासाठी मराठी एकीकरण समितीचे कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष गणेश धोंडू तिखंडे यांनी  पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी याला चांगलीच अद्ल घडवली, त्यामुळे तिंखडे यांचे परीसरातून कौतुक होत आहे.


या बाबतीत सविस्तर वृत्त असे की कल्याण पुर्व तिसगावपाडा येथे राहणारे सचिन सोमा ढाके  हे त्यांचे सासरे शंकर भोईर वय ५६ वर्षे हे नोबेल हाँस्पिटल डोंबिवली पुर्व या ठिकाणी अँडमिट होते. त्यांना पुढील उपचारासाठी के ई एम रुग्णालय मुंबई येथे घेऊन जाण्यासाठी निघाले असता नोबेल हाँस्पिटल येथे रिक्षाची मोठी लाईन लागली होती. सदर ठिकाणी जागा अपुरी असल्याने रुग्णवाहिका येत असताना रस्त्यावर एक रिक्षा एम एच ०५, ३८०८ बरोबर मधी उभी केली होती. त्यामुळे त्याला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. परंतु रिक्षा बाजूला घेण्यास नकार देऊन वादावादी सुरू केली. त्यामुळे त्यांनी ही घटना मराठी एकीकरण समितीचे कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष गणेश धोंडू तिंखडे यांनी डोंबिवली शहर वाहतूक शाखा येथे तक्रार दाखल केली, तसेच सचिन ढाके यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याची दखल डोंबिवली शहर वाहतूक पोलिसांनी घेतली. रिक्षा चालक नरेंद्र तिवारी या परप्रांतीय मुजोर रिक्षाचालकाला सुमारे १० हजार रुपये दंडात्मक कारवाई केली.

अशा मुजोर रिक्षाचालकांना धडा शिकवायला पाहिजे असे गणेश तिंखडे यांनी सांगितले. तसेच सगळेच रिक्षाचालक वाईट नाही असे ही ते म्हणाले. त्यामुळे डोबिवली मध्ये भाडे नाकारणे, छेडछाड, वादावादी, हुज्जत घालणे, आदी प्रकार करणाऱ्या रिक्षा चालकांना चाफ बसणार आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...