चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा सापडले अवकाशातून पडलेल्या वास्तू !!
भिवंडी, दिं,८, अरुण पाटील (कोपर) :
चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही आणि ब्रम्हपुरी तालुक्यात आता पर्यंत एक पन्नास किलो वजनाची रिंग तर पाच व्हॉली बालच्या आकाराचे सिलेंडर आढळून आले आहेत. अद्याप अवकाशातून पडलेल्या सँटेलाईट रॉकेटचे तुकडे आढळून येणे थांबलेले नाही. एक रिंग आणि पाच सिलेंडर जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात असताना पुन्हा चिमूर तालुक्यात एक गोलाकर रिंग आणि एक सिलेंडर आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत सहा गोल सिलेंडर आणि दोन रिंग अवकाशातून पडलेल्या वस्तू आढळून आल्या आहेत.
शनिवारी (दि.2 एप्रिल) च्या रात्री आठच्या सुमारास अवकाशातून आगीचे गोळे जमिनीवर कोसळताना आढळून आले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यात या अवकाशीय वस्तूंचे दर्शनही नागरिकांना झाले. चंदपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावामध्ये सर्वप्रथम गोलाकार जड रिंग आढळून आली होती. तर पवनपार येथे व्हॉलीबाल आकाराचा सिलेंडर आढळून आला होता.
त्यांनतर त्याच तालुक्यात आसोलामेंढा तलाव परिसर, मऱ्हेगाव व गुंजेवाही शेजारी तीन सिलेंडर आढळून आले होते. ही घटना ताजी असतानाच जिल्हयातील ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा बोदरा येथे आणखी एक गोलाकार सिलेंडर आढळून होता. बुधवारी (6 एप्रिल) चिमूर तालुक्यात आणखी एक एक रिंग व एक सिलेंडर आढळून आले आहे.
चिमूर तालुक्यातील खडसंगी वन परिक्षेत्राअंतर्गत तळोधी बीटातील कक्ष क्रमांक 45 मधील वनतलावाजवळ वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, आपल्या सहकार्यासह नियमित गस्त घालीत होते. त्यांना तलावात विचित्र अशी वस्तू दिसल्याने त्याला बाहेर काढले असता, जिल्ह्यात सध्या चर्चेत असलेल्या सॅटलाईट राँकेटचे अवशेष असल्याचे समजले. त्यांनी याबाबतची माहिती चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सांगळे यांना दिली. त्यांनी अवकाशीय अवशेष आपल्या ताब्यात घेतले.
सध्य स्थितीत हे अवशेष चिमूर पोलीस स्टेशन इमारतीमध्ये ठेवण्यात आला असून अंतराळ विभागातील तज्ज्ञ आल्यानंतर त्यांचेकडे हा अवशेष सोपविण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
चंद्रपूर जिल्हयात आतापर्यंत सहा गोलाकार सिलेंडर तर दोन रिंगा आढळून आल्या आहेत. पुन्हा त्या अवकाशीय सँटेलाईट राँकेटचे अवशेष आढळून येण्याची शक्यता खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी वर्तविली आहे. जिल्हाधिकारी यांनी इतरत्र आढळून येणाऱ्या अवकाशीय वस्तु प्रशासनाच्या स्वाधीन करावे असे आवाहन केले होते. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक अवकाशीय वस्तू आढळून आल्यानंतर प्रशासनाला माहिती देवून वस्तू ताब्यात देत आहेत.

No comments:
Post a Comment