Wednesday, 20 April 2022

मंडणगड आगारातील १३५ कामगार २० एप्रील २०२२ पासुन हजर होणार !

मंडणगड आगारातील १३५ कामगार २० एप्रील २०२२ पासुन हजर होणार !


मंडणगड, प्रतिनिधी (गणेश नवगरे) : मुंबई उच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानुसार गेले पाच महिने संपावर असलेले एस.टी. कामगार हळहळू कामावर परतू लागले आहेत. संपात सहभागी कर्मचारी २२ एप्रिल २०२२ पुर्वी कामावर हजर न झाल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे पार्श्वभूमीवर व तालुक्यातील ग्रामिण भागातील वाहतूक पुर्णपणे ठप्प असल्याने कर्मचारी कामावर कधी परतणार या विषयी तालुक्यातील सर्वच समाज घटकांत कमालीची उत्सुकता आहे. या संदर्भात येथील आगार व्यवस्थापक श्री.हनुमंत फडतरे यांच्याकडून मिळालेल्या माहीतीनुसार २० एप्रिल २०२२ अखेर संपात सहभागी झालेले १३५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.

आगारातील पट २०० कर्मचाऱ्यांचा आहे यातील काहीवर बडतर्फीची कारवाई झाली आहे दरम्यान बुधवार व गुरुवार या दोन दिवसात किती कर्मचारी कामावर येणार आहेत याचे अंतीम चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान मंडणगड तालुक्याच्या संपर्कात असणाऱ्या जनतेची गैरसोय होवू नये या करिता मिरज, शिर्डी, मुंबई, नालासोपारा. परळ वाकडा अंजर्ले या मार्गावर या पुर्वीच प्रवासी फेऱ्या सुरु झाल्या आहेत तसेच ग्रामिण भागात वेळास तोंडली या मार्गावर प्रवासी फेऱ्या सुुरु झाल्या आहेत. याशिवाय दापोली व मुंबई डेपोंमधील प्रवाशी फेऱ्यांचा तालुकावासीयांना लाभ मिळत आहे. खेड, दापोली, महाड, या तालुक्यांचे ठिकाणांवर लोकल मार्गावर प्रवासी फेऱ्या सुरु आहेत. संपानतर कामावर हजर होत असलेल्या कर्मचाऱ्यांकरिता अगाराकडून कर्मचारी मेडिकल व ट्रेनिंग सुरू झाले असून येत्या चार पाच दिवसा मंडणगड आगार शंभर टक्के कार्यक्षमतेने सुरु होण्याचे संकते मिळत आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या संपामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, प्रवासी व मंडणगड शहरातील व्यापारी यांचा सुरु असलेला त्रास कमी होण्यास आता सुरुवात होणार आहे.

ग्रामिण भागातील वाहतूक बंद असल्याने त्याचा सर्वाधीक फटका शहराचे बाजारपेठेस झाल्याचे दिसून आले बाजारात खरेदीची गर्दी नसल्याने जीवनावश्यक वस्तुंची आवाक घटलेली दिसून आली नेहमीच्या व्यापाऱ्यात चाळीस ते पन्नास टक्के इतकी घट येथील व्यापाऱ्यांना संपामुळे सहन करावी लागली आहे. बाजारपेठेत गिऱ्हाईकच नसल्याने एक प्रकारे नुरुस्तासाहाचे वातावरण निर्माण झालेले आहे, महाराष्ट्राची लाडकी लाल परी ग्रामिण भागात पुन्हा धावणार असल्याने एक प्रकारेचे उत्साहाचे वातावरण पहायला मिळणार आहे.

९ नोव्हेंबर २०२१ पासून मंडणगड आगारातील कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले होते संपाच्या काळात झालेल्या घटनामुळे परत कामावर येण्याऱ्याचे प्रमाण अत्यल्प होते. या ही परिस्थितीत इतर डेपोंच्या मदतीने तालुक्याबाहेर वाहतूक सुरु ठेवण्याचे प्रयत्न झाले यात मुंबई नालासापोरा मार्गावर एस.टी वाहतूक सुरु होती. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण झाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी सुरू होते काम बंद आंदोलन सुरु होते. यात दिवाळी शिमगा हे मुख्य उत्पन्नांचे हंगाम कोरडे गेलेले असताना खाजगी वाहतूक दरांनी सर्वासमान्यांची पिळवणुक करत लयलुट करुन आपले हात चांगलेच ओले करुन घेतले आहे. कर्मचारी परतल्यानंतर वाहतूक सुरु होणार असल्याने शहरातील व्यापाऱ्यांमध्ये मात्र विशेष उत्सहाचे वातावरण आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...