Wednesday, 6 April 2022

भुसावळ येथे १० एप्रिल रोजी माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन !! • मेळाव्यासाठी माजी सैनिकांनी नोंदणी करावी

भुसावळ येथे १० एप्रिल रोजी माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन !!
• मेळाव्यासाठी माजी सैनिकांनी नोंदणी करावी


भुसावळ, बातमीदार : स्टेशन हेडक्वार्टर, भुसावळ जि. जळगांव येथे १० एप्रिल २०२२ रोजी आरपीडी मैदानावर शेड क्रमांक पी – ३४५ या ठिकाणी सकाळी सकाळी ९.३० वाजता माजी सैनिकांसाठी मेळावा अयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्यामध्ये ईसीएचएस पॉलीक्लीनिक, ईसीएचएस कार्ड्स, वेतरन सेल, अभिलेखा कार्यालय स्टॉल, तक्रार काऊंटर, सेक्शन हॉस्पीटल कक्ष व सीएसडी कँटीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे.  मेळाव्यासाठी स्टेशन हेडक्वार्टर, भुसावळ यांचेकडून वाहनाची कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नसून स्वत:च्या बंदोबस्ताने जावायचे आहे. जे माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी जाणार आहेत. अशा सर्व माजी सैनिकांनी वाहन चालक अर्जन गाडेकर यांच्या 9921379711 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून तात्काळ आपली नोंदणी करावी. सदर नोंदणी ८ एप्रिल २०२२ पर्यंत सायं ५ वाजेपर्यंत सुरू असेल. दिलेल्या वेळेतच नोंदणी करण्यात येईल. याची सर्व माजी सैनिकांनी नोंद घ्यावी, असे  सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर निंबाजी पडघान यांनी कळविले आहे.
 

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...