परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते सहा फेसलेस सेवेचा शुभारंभ !!
मुंबई, गणेश नवगरे :
आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी वाहन चालकांना लागणारे एनओसी, डुप्लिकेट नोंदणी, पत्ता बदल आणि आरसीमधील पत्ता बदल, परवान्यांचे नूतनीकरण संदर्भातील कामासाठी वाहन मालक- चालकांना आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. आजपासून या सहाही सेवा ऑनलाईन पद्धतींने अर्थात फेसलेस सेवा सुरु केल्या आहे. या फेसलेस सेवांचे उदघाटन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
राज्य परिवहन विभागामार्फत ११५ अनुज्ञप्ती, नोदणी प्रमाणपत्र, परवाना संबंधीत सेवा देण्यात येत असून, ८४ सेवा ऑनलाईन केले आहेत. अर्जदार ऑनलाईन अर्ज, ऑनलाईन पेमेंट व कागदपत्रे अपलोड करु शकतो. याशिवाय या सेवांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास कार्यालयामध्ये मूळ नोंदणी प्रमाणपत्र / अनुज्ञप्तीसह कागदपत्रे जमा करण्यासाठी आरटीओ कार्यालयात याव लागते. केंद्र शासनाने ३ मार्च २०२१ रोजीच्या अधिसूचनेद्वारे १८ सेवा या आधारक्रमांकचा वापर करुन नागरिकांना फेसलेस पध्दतीने (ऑनलाईन) देण्याबाबत अधिसूचीत केली होती. त्यानुसार, महाराष्ट्र्र राज्य परिवहन विभागाने अनेक सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरु केल्या आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते सहा फेसलेस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी लागणारी एनओसी, डुप्लिकेट लायसन्स, पत्ता बदल आणि आरसीमधील पत्ता बदल, परवान्यांचे नूतनीकरण संदर्भातील कामासाठी नागरिकांना आरटीओमध्ये वाहन चालकांना जावे लागणार नाही. या योजनेमुळे जवळपास राज्यातील १७ ते १८ लाख नागरिकांना फायदा होणार असल्याची माहिती अनिल परब यांनी माहिती दिली आहे.

No comments:
Post a Comment