Wednesday, 22 June 2022

पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कराटे स्पर्धेत कल्याण शनाया आर्य ने पटकावले 'गोल्ड मेडेल !अभिनंदनाचा वर्षाव !

पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कराटे स्पर्धेत कल्याण शनाया आर्य ने पटकावले 'गोल्ड मेडेल !अभिनंदनाचा वर्षाव !


कल्याण, (संजय कांबळे) : शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कराटे स्पर्धेत सब ज्युनिअर अंडर १३ मुलींच्या श्रेणीमध्ये कल्याण डोंबिवली च्या शनाया आर्य हिने 'गोल्डमेडल, पदकांची कमाई केली असून त्रुतूजा दळवी, गोरांगी निकम आणि वेदांत चतुर्वेदी, जय मिश्रा यांना ब्रांझ पदकावर समाधान मानावे लागले. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण कल्याण डोंबिवली परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, तर कल्याण च्या ऐतिहासिक हा एक मानाचा तुरा रोवला असल्याचे कल्याण डोंबिवली कराटे असोसिएशनचे प्रेसिडेंट बी एच चौधरी व सेक्रेटरी अनूप नायर यांनी म्हटले आहे.

कल्याण डोंबिवली परिसरात विवेक शुक्ला हे गेली १३ वर्षे मार्शल आर्टस शोतोकन हा कराटे क्लास शिकवत आहेत, त्यांच्या क्लास मधील अनेक मुला मुलीनी या अगोदर अनेक कराटे स्पर्धा गाजवलेल्या आहेत. नुकतेच महाराष्ट्र राज्य अजिंक्य पद कराटे स्पर्धा २०२२ चे आयोजन पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात केले होते. यामध्ये कोच शुक्ला यांच्या मुला-मुलींनी भाग घेतला होता. संपूर्ण राज्यातून स्पर्धक आले होते. अंत्यत अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत सब ज्युनिअर अंडर १३ मुलीच्या श्रेणीमध्ये शयाना आर्य हिने गोल्डमेडेल मिळवले तर त्रुतूजा दळवी, ब्रांझ मेडेल, केडेट १४-१५ मध्ये गौरांगी निकम व वेदांत चतुर्वेदी व ज्युनिअर १६-१७ मध्ये जय मिश्रा या सर्वांनी ब्रांझ मेडेल पटकावले.

त्यांच्या या उत्तम कामगिरी व उज्ज्वल यशाबद्दल कराटे असोसिएशन आँफ, महाराष्ट्र असोसिएशनचे प्रिंसेडेट अल्लाउद्दीन अन्सारी, सेक्रेटरी संदिप घारे, कल्याण डोंबिवली कराटे असोसिएशनचे प्रिंसेडेट बी एच चौधरी तसेच सेक्रेटरी अनुप नायर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तर या खेळाडूचे कोच विवेक शुक्ला यांनी याचे सर्व क्षेय मुले, त्यांचे पालक व वरीष्ठांना दिले आहे.

त्यांना या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, कराटे या खेळाला आता जागतिक पातळीवर मान्यता मिळत आहे, कल्याण डोंबिवली परिसरात चांगली, मेहनती, मुले आहेत, महानगरपालिकेने यांच्यासाठी सुसज्ज असे क्रीडा संकुल निर्माण करायला हवे, मुलांच्या या कामगिरी मुळे कल्याण डोंबिवली चे नाव राज्य भर चमकले आहे असे ही त्यांनी सांगितले, तसेच या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी योगीधाम कल्याण येथे आपला मार्शल आर्टस शोतोकन सुरू केला आहे असे ही सांगितले..

 

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...