Sunday, 5 June 2022

समाजासाठी झटणारे चेंबूरचे "पंचरत्न" मित्र मंडळ महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित !!

समाजासाठी झटणारे चेंबूरचे "पंचरत्न" मित्र मंडळ महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
           समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत. या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अनेक प्रकारे साहाय्य करतात. अन्नधान्य, कपडे, गृहोपयोगी वस्तू, औषधे, वह्या, पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे. 


समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड, खजिनदार : सचिन साळूंखे, उपाध्यक्ष : रमेश पाटील, सहसचिव : वैभव घरत, सल्लागार : हनुमंता चव्हाण यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. मंडळाची स्थापना २००५ मध्ये करण्यात आली असून आजपर्यत मंडळाच्यावतीने विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात. या मंडळाला नुकताच अखिल भारतीय मानव विकास परिषद व आदर्श मुंबई (पाक्षिक) यांच्या आयोजित पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज "महाराष्ट्र भूषण" या मानाच्या लोकसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक डॉ. संजय भोईर, संयोजक : श्री अशोक भोईर यांच्या साहित मान. नरेंद्र वाबळे : अध्यक्ष मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई, आंतरराष्ट्रीय व्याख्याते : डॉ. पवन अग्रवाल, मुंबई कॉंगेस कार्याध्यक्ष : चरणसिंग सप्रा, महाराष्ट्राचे लाडके गायक, बिग बॉस फेम संतोष चौधरी "दादूस " इ. मान्यवर उपस्थित होते. पंचरत्न मित्र मंडळास सदर पुरस्कार मिळाल्याचे वृत्त कळताच सर्व स्तरातून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...