Thursday, 23 June 2022

कुसुम वात्सल्य संस्थेच्या वतीने ५१ महिलांना आदिशक्ती पुरस्काराने सन्मानित !!

कुसुम वात्सल्य संस्थेच्या वतीने ५१ महिलांना आदिशक्ती पुरस्काराने सन्मानित !!


पुणे, प्रतिनिधी - कुसुम वत्सल संस्थेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला. गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे कर्तृत्ववान महिलांचा, त्यांच्या कार्याचा संस्थे तर्फे सन्मान करण्यात आला. स्त्री कर्तृत्व आदिशक्ती पुरस्कार वितरण समारंभ सातारा रोड येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 
    कार्यक्रमाचे अध्यक्ष माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिणकर होते, त्याचबरोबर राजू सांगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस उपनिरीक्षक अशोक टोके,विधिज्ञ प्रार्थना सदावर्ते,विधिज्ञ रमेश खेमू राठोड, गुन्हे शाखेच्या मनीषा टुले, बाळासाहेब नेहरकर, अमोल भोगणे, विशाल घोलप, आनंद भोगणे, अतुल गुंजाळ, मीनाक्षी भालेराव, दीप्ती शहा, लीना मुंडलिक, मानसी जाधव, चेतना बिडवे.. विनोद गलांडे, रोहित शिंदे, महेश धाडवे, काळुराम ढोबळे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 
    बेटी बचाव, बेटी पढाव बाबत संदेश देण्यात आला. शहरात आणि खेडोपाडी होणारे लहान मुला मुलींवरील अत्याचार यावर आकर्षक नृत्य सादरीकरन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा शितोळे यांनी केले तर कार्यक्रमाचे संयोजन कुसुमवात्सल्य फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...