Sunday, 5 June 2022

सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल अंसुरे ग्रामपंचायतीचा महाराष्ट्र शासनतर्फे सन्मान !!

सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल अंसुरे ग्रामपंचायतीचा महाराष्ट्र शासनतर्फे सन्मान !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
             माझी वसुंधरा २ -आवार्ड - २०२२ सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल अंसुरे ग्रामपंचायतीचा सन्मान आज मा. उप मुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेब तसेच महसूलमंत्री मा बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री, युवा नेते मा. श्री. आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते मुंबईत नरिमन पॉईंट टाटा थिअटर येथे भव्य सन्मान आणि पारितोषिक प्रदान सोहळ्यात करण्यात आला.

यावेळी अंसुरे ग्रामपंचायत सरपंच श्री. रामचंद्र कणेरी, उपसरपंच सौ. प्रांजल प्रशांत गावकर, सदस्य श्री. प्रवीण गावकर, श्री. उल्हास आंबोळकर, ग्रामविकास अधिकारी श्री. राजेंद्रप्रसाद राऊत व माजी उप सभापती श्री. प्रशांत गावकर आदी मान्यवर उपस्थित होते. अंसूरे ही कोकण विभागातून एकमेव ग्रामपंचायत, महाराष्ट्र शासनांच्या पर्यावरण आणि वातावरणातील बदल, माझी वसुंधरा  अभियान संचनालय विभागमार्फत निवडली गेली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन अंसूरे ग्रामपंचायत, जि. रत्नागिरीने शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या माझी वसुंधरा २०२१- २२ या स्पर्धेत ग्रामपंचायत गटात विभाग स्तरावर हे पारितोषिक मिळवले आहे. म्हणून माझी वसुंधरा योजना कोकण विभागातून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यातील अंसूरे ग्रामपंचायतीचा आज बहुमान मिळाला म्हणून कार्यक्रमानंतर सरपंच श्री. रामचंद्र कनेरी व सर्व सदस्यांचे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका राजापूरचे सरचिटणीस श्री. अनिल भोवड व श्री. जयवंत नाचणेकर यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...