Tuesday, 12 July 2022

नियमित कर्ज भरणा करणाऱ्यांना अनुदान द्या ! 'वराड शेतकऱ्यांची मागणी'

नियमित कर्ज भरणा करणाऱ्यांना अनुदान द्या ! 'वराड शेतकऱ्यांची मागणी' 


चोपडा, बातमीदार.. तालुक्यातील वराड येथील पंधरा- वीस शेतकरी यांनी 31 मार्च च्या आत सहकारी सोसायटी मार्फत घेतलेले कर्ज भरणा नियमित केलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी सहकारी संस्थेचे कर्ज वेळेवर भरले आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु शेतकऱ्यांना जुलै महिना उजाडला तरी अनुदान मिळालेले नाही. नवीन मुख्यमंत्री शिंदे सरकार आले आहे. शेतीचा हंगाम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना अनुदानाचे त्वरित वाटप करावे. अशी मागणी किसान सभा तर्फे कामगार नेते अमृत महाजन, शाखा अध्यक्ष अंबालाल राजपूत, वासुदेव कोळी, अनंत चौधरी, पुंडलिक राजपूत मनोहर चौधरी, रतीलाल बाविस्कर आसाराम कोळी सुकलाल कोळी आदींनी केली आहे. अनुदान प्रशनी चोपडा तालुका किसान सभा तर्फे शेतकऱ्यांचे आंदोलनाचा इशारा शासनाला देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...