गणेशोत्सवाच्या तोंडावर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करा आणि शहर स्वच्छतेसाठी उपाययोजना करा - मा. शिवसेना नगरसेवक
कल्याण, बातमीदार : गणेशोत्सवाच्या तोंडावर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करा आणि शहर स्वच्छतेसाठी उपाययोजना करा अशी मागणी शिवसेनेच्या तीसहून अधिक नगरसेवकांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध समस्या आहेत, त्या लवकरात लवकर दूर करण्याबाबत बैठकीत आयुक्तांना निवेदन देण्यात आले. कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. याबाबत आज शिवसेनेच्या नगरसेवकांची पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासोबत बैठक पार पडली. पावसाने उघडीप दिली आहे त्यामुळे २४ तास काम सुरू ठेवत खड्डे भरण्याचं काम पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन आयुक्तांनी नगरसेवकांना दिलं. खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले असून गणेशोत्सवापूर्वी डांबरीकरण आणि रस्ते खड्डेमुक्त करण्याचे व शहर स्वच्छतेचे संकेत आयुक्तांनी यावेळी दिले.

No comments:
Post a Comment