Wednesday, 24 August 2022

जमिनीच्या व्यवहारात फसवणूक करणाऱ्या म्हात्रे कुटुंबीयांविरोधात मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

जमिनीच्या व्यवहारात फसवणूक करणाऱ्या म्हात्रे कुटुंबीयांविरोधात मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !


मांडवा (अलिबाग), संदीप शेंडगे : जमिनीचे पैसे घेऊन जमीन विकण्यास नकार देणाऱ्या मांडवा येथील म्हात्रे कुटुंबीयांवर फसवणूक केल्याप्रकरणी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मांडवा मौजे बैलपाडा येथे मारुती म्हात्रे कुटुंबियांची चार गुंठे जागा आहे ही जागा विकण्याकरिता म्हात्रे यांनी गावातील बबन पाटील यांना कळविले. बबन पाटील यांनी त्यांच्या ओळखीचे अश्विनी नितीन गायकवाड यांना जागा घेण्यासंदर्भात विचारणा केली अश्विनी गायकवाड यांनी त्वरित जागा घेण्याचे ठरवले त्यानुसार जागा मालक मारुती म्हात्रे आणि अश्विनी गायकवाड यांच्यात व्यवहार होऊन साडेतीन लाख रुपये गुंठा याप्रमाणे चार गुंठे जागा १४ लाख रुपयास अश्विनी मात्र यांनी खरेदी केली. त्या पोटी त्यांनी १ सप्टेंबर २०२१ रोजी इसारा रक्कम म्हणून तीन लाख रुपये मारुती म्हात्रे यांना अंधेरी येथील आयसीआयसीआय बँकेमार्फत आरटीजीएस केले. तसेच ३ मार्च २०२२ रोजी सात लाख रुपये अंधेरी येथील आयसीआयसीआय बँकेमार्फत पुन्हा आरटीजीएस केले.
दहा लाख रुपये दिल्यानंतर अश्विनी नितीन गायकवाड यांनी राहिलेला जमिनीचा व्यवहार पूर्ण करून देण्यासाठी मारुती म्हात्रे यांच्याकडे विचारणा केली असता म्हात्रे हे उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले.
आता वेळ नाही नंतर करू काही दिवसानंतर करू एक महिन्यांनी करू असे वेगवेगळे बहाणे करू लागले. जमीन मालक सतत वेगवेगळे बहाणे करून व्यवहार पूर्ण करण्यास तयार नसल्याचे लक्षात येताच अश्विनी यांनी तुम्हाला व्यवहार पूर्ण करायचा नसेल तर आमचे घेतलेले पैसे परत करा असे मारुती म्हात्रे यांना सांगितले परंतु घेतलेले पैसे मी परत करणार नाही आता माझ्याकडे पैसे नाही तुम्हाला काय करायचे ते करून घ्या मी पैसे देऊ शकत नाही. तसेच मारुती म्हात्रे यांच्या पत्नी सुलोचना मात्रे यांनी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून देण्याची धमकी दिली आम्ही तुमचे पैसे देऊ शकत नाही तसेच मुलगा धीरज व सतेज यांनीही पैसे देण्यास नकार देऊन शिवीगाळ केली असे अश्विनी गायकवाड यांना सांगितले. परंतु मारुती म्हात्रे यांनी जमिनीचा व्यवहार इतर व्यक्तीबरोबर करून त्याच्याकडूनही पैसे घेतल्याचे निदर्शनास आले. आमचे पैसे घेऊन जमीन दुसऱ्यालाच विकली असल्याने जमिनीच्या व्यवहारात आपली फसवणूक झाली आहे असे लक्षात गायकवाड यांच्या लक्षात आले.त्यांनी अलिबाग मांडवा येथील सागरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन म्हात्रे कुटुंबातील मारुती म्हात्रे, सुलोचना मात्रे, धीरज म्हात्रे, सतेज म्हात्रे, यांच्या विरोधात भादवि 420, 406, 406, 34, नुसार गुन्हा दाखल केला. याबाबतचा अधिक तपास दिपाली खाडे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...