Monday, 22 August 2022

डोंबिवलीतील ह.भ.प सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुलाची आयुक्तांनी आज केली पाहणी ! 'नागरिकांच्या/खेळाडुंच्या' सोईसुविधेसाठी लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे दिले आदेश...

डोंबिवलीतील ह.भ.प सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुलाची आयुक्तांनी आज केली पाहणी !

'नागरिकांच्या/खेळाडुंच्या' सोईसुविधेसाठी लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे दिले आदेश...


कल्याण, बातमीदार : महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी आज डोंबिवलीतील ह.भ.प सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुलातील तरण तलाव, बंदिस्त क्रिडा गृह,जिमन्यॅशियम, टेबल टेनिस कोर्ट परिसराची पाहणी केली, गेली २ वर्षे कोविड कालावधीत सावळाराम क्रिडा संकुलात कोविड रुग्णालय सुरु असल्याने तेथील क्रिडा विषयक सुविधा बंद असल्याची माहिती उपअभियंता शैलेश मळेकर यांनी दिली. 


तथापि तरण तलावाच्या फिलट्रेशन प्लांट मधील फिल्टर्स दुरुस्त करण्यात आले असून सदर तरण तलाव चालविण्यासाठी मनुष्यबळ, लाईफ गार्ड यांची नेमणूक केल्यास तरण तलाव सुरु करता येईल अशी माहिती मळेकर यांनी दिली. त्याप्रमाणे बंदिस्त क्रिडागृह, जिमन्यॅशियम, टेबल टेनिस कोर्ट सुरु करण्यासाठी करावयाच्या दुरुस्ती कामाबाबत माहिती आयुक्त डॉ.दांगडे यांना दिली असता वरील सर्व क्रिडा विषयक सुविधा महापालिकेवर जास्त आर्थिक भार न पडता कशा पध्दतीने उत्तम रित्या चालवता येतील याबाबत अभ्यास पूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्त दांगडे यांनी मालमत्ता विभागाच्या उपआयुक्त पल्लवी भागवत, क्रिडा विभागाचे उपआयुक्त अनंत कदम, सहा.आयुक्त स्नेहा करपे यांना दिले.


या पाहणी दौ-याचे वेळी परिमंडळ २ च्या उपआयुक्त स्वाती देशपांडे, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, किरण सोनावणे तसेच फ व ग प्रभागाचे सहा.आयुक्त उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...