संतोष जैतापकर यांच्या वैद्यकीय टीमची दमदार कामगिरी तब्बल ११ लाख ४४ हजाराचे हॉस्पिटलचे बिल केले माफ !
*[निवोशी / गुहागर : उदय दणदणे]*
कोविड १९ च्या काळात देशात भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. कोरोना व्हायरसने मानव जातीला सैरावैरा करून सोडले होते.
अशा परिस्थितीत सामान्य जनतेच्या पाठी खंबीरपणे उभे राहणारे समाजनेते व भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष तसेच निर्मळ लक्ष फाउंडेशनचे संस्थापक- श्री संतोष जैतापकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड १९ च्या संकट काळात मुबंई व मुबंई उपनगरात व पुणे सारख्या शहरात राहणाऱ्या गुहागर वासीयांकरीता व गरजू नागरिकांच्या मदती करीता एक वैद्यकीय टीम कार्यन्वित करण्यात आली आहे. सदर तुमच्या माध्यमातून अनेक गरजूंना दिलासा मिळाला असून नुकतंच संतोष जैतापकर यांच्या वैद्यकीय टीमने नवी मुंबईत राहणाऱ्या न्यूमोनिया या आजारावर बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सुनीता साखरे यांचे तब्बल ११ लाख ४४ हजाराचे बिल माफ करून सदर टीमने दमदार अशी भूमिका बजावली.
पनवेल मुबंई येथे राहणाऱ्या सुनीता साखरे ही महिला जवळ जवळ दीड महिना नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन न्यूमोनिया वरती उपचार घेत होत्या सदर उपचारादरम्यानचे बिल तब्बल १७ लाख ४४ हजार एवढे झाले. मात्र घरची परिस्थिती गरिबीची असल्याने ६ लाख एवढी रक्कम जमवाजमवी करून हॉस्पिटलला भरले. परंतु बाकी राहिलेली रक्कम भरण्यासाठी हॉस्पिटलकडून तगादा सुरू होता आणि पेशंटला डीचार्ज देण्यात टाळाटाळ करत होते. सदर बाब पेशंटचे मुलगा राज साखरे यांनी त्यांचे नातेवाईक भाऊ पराग सुर्वे यांचा मित्र व संतोष जैतापकर यांच्या वैद्यकीय टीम मध्ये कार्यरत असणारे वाडदई गावचे युवक कु. अजित भेकरे यांच्या कडे संपर्क साधला अजित भेकरे यांनी सदर बाब विचारात घेऊन त्यांनी संतोष जैतापकर यांच्या वैद्यकीय टीमला संपर्क केला.
सदर घटनेची दखल घेत श्री काशीराम पाष्टे आणि श्री मनोज डाफळे यांनी सर्व सूत्र आपल्या ताब्यात घेऊन पेशंटच्या नातेवाईक यांना धीर देऊन
बाकीची सूत्र हलवण्यात सक्रिय प्रयत्न सुरू केले.
मुख्यमंत्री कार्यालय ते मुख्यमंत्री सुपुत्र खासदार- श्रीकांत शिंदे साहेब यांना संपर्क करून सदर बाब निदर्शनास आणून सहकार्य होण्याबाबत विनंती पूर्वक आवाहन केले आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी झाली.
वैद्यकीय टीम स्वतः हॉस्पिटलमधे जाऊन पेशंटला डीचार्ज बरोबरच बाकी राहिलेले बिल ११ लाख ४४ हजार एवढ बिल माफ करून घेतले.
या प्रसंगी मुख्यमंत्री कार्यालय आणि त्यांच्या वैद्यकीय विभाग यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले.
श्री मंगेश चिवटे साहेब, श्री राम राऊत साहेब यांचं मोलाचे सहकार्य लाभले.
श्री संतोष जैतापकर यांच्या वैद्यकीय टीम चे शिलेदार श्री काशीराम पाष्टे, श्री मनोज डाफळे, कु अजित भेकरे यांनी केलेल्या सहकार्य बद्दल पेशंटच्या नातेवाईक यांनी आभार मानले असून सदैव जनसेवेस आपलं बहुमूल्य योगदान देणारे समाजनेते श्री संतोष जैतापकर आणि त्यांच्या वैद्यकीय टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन सह कौतुक होत आहे.




No comments:
Post a Comment