"केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर" यांना दिले गेले निवेदन
कल्याण / प्रतिनीधी : केद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभेच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत.या वेळी ते कल्याण डोंबिवली मुख्यालयात आले असताना त्यांना राष्ट्रीय न्यूज चॅनल हे त्यांना दिलेल्या 'एडवायजरी'चे पालन करीत नसल्याचे दिसून येत असल्याचे निवेदन ठाकूर यांना वेळी देण्यात आले. "राष्ट्रीय न्यूज चॅनल' हे या 'एडवायजरी'चे पालन करीत नाहीत असे त्यांना सांगितले असता अनुराग ठाकूर म्हणाले की या बाबत 'राष्ट्रीय न्यूज चॅनल' या सूचना पाळण्याचे सांगितले जाईल"
चार महिन्या पूर्वी राष्ट्रीय न्यूज चॅनलला 'केबल टेलिव्हिजन एक्ट १९९५' नुसार 'सूचना आणि प्रसारण मंत्रालया'ने एक "एडवायजरी' जारी केली होती.रशिया युक्रेन कव्हरेज, दिल्लीतील जाहंगिर पुरी हिंसा व लाऊड स्पीकर या बाबत न्यूज चॅनल वर झालेल्या डिबेट शो प्रकरणी 'सूचना आणि प्रसारण मंत्रालया'ने नाराजी व्यक्त करीत त्यांना ही "एडवायजरी' जारी केली होती.
या बाबत 'सूचना प्रसारण मंत्रालया"ने ही 'एडवायजरी' जारी करून सांगितले होते की, असामाजिक, असंसदीय आणि उसकावण्याऱ्या 'हेड लाईन' देण्या पासून न्यूज चॅनलने वाचले पाहिजे. असे असताना राष्ट्रीय न्यूज चॅनल 'सूचना व प्रसारण मंत्रालया'च्या "एडवडवाजरी" चे पालन करीत नसल्याचे दिसून येत होते.आता 'सूचना आणि प्रसारण' मंत्र्यांना या बाबत निवेदन देवून मागणी केल्या मुळे आता न्यूज चॅनल अश्या असामाजिक, असंसदीय आणि उसकावण्याऱ्या हेड लाईन देण्या पासून थांबतील अशी आशा व्यक्त करण्यात आली.


No comments:
Post a Comment