अध्यक्षपदी निवड होताच कामांना सुरुवात, बीडिओ व गटशिक्षणाधिकारी यांची घेतली भेट, शाळेस शिक्षक देण्याची मागणी !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश शंकर गायकवाड यांची उशीद शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी कामांचा धडाका सुरू केला असून कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन जिल्हा परिषद शाळा उशीद ला एक शिक्षक देण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद शिक्षणाधिकारी डॉ. रुपाली खोमणे यांनी दिला.
तालुक्यातील अनेक समाजपयोगी व लोकहितार्थ कामासाठी ग्रुप ग्रामपंचायत उशीद आरेला गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश शंकर गायकवाड हे नेहमीच आघाडीवर असतात. त्यांनी शेतकरी सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष पदही भूषविले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसह गोरगरीब, कष्टकरी शेतमजूर यांच्या सुख दु:खात सहभागी असतात, अशा जनहितार्थ काम करणाऱ्या लोकसेवकाची उशीद जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली.
त्यांनी ताबडतोब गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या शाळेच्या पाण्याच्या टाक्या साफ केल्या, शिवाय शाळेचा परिसर साफसफाई करून घेतली. यानंतर आज कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी आणि गटशिक्षणाधिकारी डॉ. रुपाली खोमणे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद शाळा उशीद येथे १२७ पटसंख्या असून केवळ ३ शिक्षक आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रमात अडचणी येतात, त्यामुळे आमच्या शाळेत एक शिक्षक द्यावा अशी मागणी केली. शिवाय लाईट बील व इतर अनेक उपक्रम व शाळेला उपयोगी असणाऱ्या गोष्टी व घटना विषयी सविस्तर माहिती घेतली व चर्चा केली.
यावेळी शाळेस लवकरच शिक्षक देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले तसेच श्री गायकवाड यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्ल गटशिक्षणाधिकारी डॉ. रुपाली खोमणे व गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पत्रकार संजय कांबळे देखील उपस्थित होते.




No comments:
Post a Comment