सावंतवाडी / सिंधुदुर्ग, दि.२३ (ऑनलाईन वृत्तसेवा) : कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे तरुण, तडफदार उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे सलग दुसऱ्या दिवशीच्या सदिच्छा भेट दौऱ्यात सावंतवाडी तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी सावंतवाडी तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवांनी शिक्षकांचा आमदार शिक्षकच असला पाहिजे असा निर्धार करत प्रचारात उत्साह दर्शवला. सदिच्छा भेटी दरम्यान दिवसभर शिक्षक कार्यकर्त्यांचा जोरदार उत्साह पाहायला मिळाला. तालुक्यातील प्रत्येक शाळेतील उपस्थित शिक्षकांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे जोरदार स्वागत केले. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी यावेळी प्रत्येक ठिकाणी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न आणि भेडसावणाऱ्या समस्यांची जाण त्याच क्षेत्रातल्या व्यक्तीला माहीत असतात. सदर प्रश्न आणि समस्या तो आपले म्हणुनच सोडवतो कारण त्या त्या व्यक्तीने जवळून पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या असतात. कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी हजारो शिक्षकांचे प्रश्न स्वतः पुढाकार घेऊन सोडविले आहेत. प्रसंगी २५० पेक्षा जास्त आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आणि अधिकारांसाठी ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेत पोहचणे गरजेचे आहे जेणेकरून आपला हक्काचा माणूस आपल्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच हजर राहील व सदर प्रश्न विधान परिषदेत मांडेल, असे मत अनेक शिक्षकांनी व्यक्त करून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना शिक्षक आमदार म्हणून निवडून देण्याचा निर्धार केला.

No comments:
Post a Comment