Thursday, 10 November 2022

राज्याचे नेतृत्व उपमुखमंत्री करतात, मी मोदी -शाह ना भेटणार-- संजय राऊत

राज्याचे नेतृत्व उपमुखमंत्री करतात, मी मोदी -शाह ना भेटणार-- संजय राऊत


भिवंडी, दिं,१o, अरुण पाटील (कोपर )
        पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी गेल्या तीन महिन्यापासून जास्त काळ अटक असलेल्या संजय राऊत यांनी आज (दिं,१0) मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्याचे नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. “उपमुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करत आहेत. मी लवकरच त्यांची भेट घेणार आहे. तसेच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहे,” असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
         त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या वरती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “संजय राऊत माझ्याजवळ बसले असून, त्यांना काही करायचे असते, तर उघडपणे आणि परखडपणे करतात. संजय राऊतांना मांडवली करायची असती, तर १०० दिवस तुरुंगात राहिले नसते. पण, त्यांनी दाखवून दिलं की, न भिता लढू शकतो. संजय राऊतांनी हे उदाहरण महाराष्ट्रापुरते नाहीतर देशापुढे उभं ठेवलं आहे.
           आम आदमी पक्षातील लोकही लढत आहे. तेलंगणातील केसीआर यांनी लाचखोरीचे प्रकरण समोर आणलं आहे. हेमंत सोरेन आणि ममता बॅनर्जी यांचा छळ सुरु आहे. मात्र, हे सगळे एकत्र आले, तर मोठी ताकद उभी राहिल, याची कल्पना बेधुंद झालेल्या राज्यकर्त्यांना आलेली दिसत नाही,” असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर केला आहे.

No comments:

Post a Comment

रायगडमध्ये कॉंग्रेस किंग मेकर : हर्षवर्धन सपकाळ

रायगडमध्ये कॉंग्रेस किंग मेकर : हर्षवर्धन सपकाळ  रायगडमध्ये महाविकास आघाडीचाच झेंडा : महेंद्रशेठ घरत  दिबांच्या जन्मभूमीत कॉंग्रेसचे प्रांता...