म्हारळ मधील जीवदानी माता परिसरातील नागरीकांचा वनवास संपणार ! आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते रस्त्याचे उद्घाटन !!
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायत हद्दीतील जीवदानी माता परिसरातील गोरगरिब, आदीवाशी, कष्टकरी लोकांचा वर्षानुवर्षे रखडलेला रस्ता आमदार कुमार आयलानी यांनी निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे पुर्ण होणार असून त्यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते नुकतेच झाल्याने येथील लोकांचा वनवास संपणार आहे.
कल्याण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून म्हारळ कडे पाहिले जाते, तब्बल १७ सद्स्य असलेल्या या ग्रामपंचायत हद्दीत अनेक सोईसुविधांची वाणवा आहे, अशी एक लोकवस्ती म्हणजे जीवदानी माता परिसर होय,येथे आदीवाशी, गोरगरीब, कष्टकरी, ग्रामपंचायत कर्मचारी असे बहुउसंख्य लोक राहतात.
या लोकवस्तीतील मुख्यरस्ता गेल्या कित्येक वर्षापासून उखडलेला, खचलेला, असा होता, तो बनवावा अशी येथील रहिवाशांची मागणी होती, पंरतु राजकारणात हा रस्ता आडवा झाला, तो दूरुस्थ करावा असे पत्र ग्रामपंचायतीने आमदार कुमार आयलानी यांच्याकडे दिले होते, त्यानुसार आमदार महोदयांनी आपल्या आमदार फंडातून सुमारे १० लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिल्याने हा प्रश्न मार्गी लागला.
त्याचे उघ्दाटन आमदार कुमार आयलानी यांच्याहस्ते नुकतेच पार पडले.
याप्रंसगी कल्याण पंचायत समितीच्या सभापती अस्मिता अजय जाधव, सरपंच निलिमा म्हात्रे, झेडपी सदस्या वैशाली शेवाळे, पंचायत समिती सदस्य रंजना देशमुख, पांडूरंग म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद देशमुख, अँड दिपक अहिरे, विकास पवार, लक्ष्मण कोंगिरे, मंगला इंगळे, नंदा म्हात्रे, मोनिका गायकवाड, अनिता देशमुख, अमृता देशमुख, बेबी सांगळे, मंडल अध्यक्ष योगेश देशमुख, समाजसेवक महेश देशमुख, केतन देशमुख, प्रवीण देशमुख तसेच म्हारळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नितीन चव्हाण व कर्मचारी ही उपस्थित होते, आणि जीवदानी माता परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते ,या रस्त्यामुळे अनेकानी आमदार कुमार आयलानी यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment