'नारायणा ई- टेक्नो स्कूल' कल्याणचा इयत्ता ३ रीत शिकणारा विद्यार्थी 'दक्ष लुल्ला' महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अजिंक्यपद स्पर्धेत चमकला !
कल्याण, (संजय कांबळे) : औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अंजिक्यपद स्पर्धा २०२२ मध्ये कल्याण डोंबिवली परिसरातील नारायणा ई टेक्नो स्कूल चा दक्ष लुल्ला ८ वर्ष +३० श्रेणी मध्ये खेळून रजत पदक मिळवले आहे. त्याच्या शाळेचेचे कराटे शिक्षक (कोच) विवेक शुक्ला आहेत. ते नेशनल रेफरी व नेशनल कोच असून
शाळेच्या मुख्यध्यापिका श्रीमती सविता राठी, झोनल डीन श्री.पवन सर तसेच उपमुख्याध्यापिका श्रीमती देबारती मित्रा यांनी याबद्दल दक्ष चे खूप कौतुक करून खूप आनंद व्यक्त केला आहे.
माननीय मुख्याध्यापिका श्रीमती सविता राठी यांनी असे मनोगत व्यक्त केले आहे की, आपल्या शाळेमध्ये कराटे खेळाला अजून महत्व देऊन खूप विद्यार्थ्यांना ह्या खेळामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करू, तसेच आपल्या शाळेचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तराला पोहचवावे, त्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू.
याशिवाय औंरगाबाद येथील विभागिय क्रिडा संकूल मध्ये महाराष्ट्र सब ज्युनिअर कराटे अंजिक्यपद स्पर्धा घेण्यात आली आहे, यामध्ये अंडर १३ मध्ये ४५ मुलींच्या श्रेणीमध्ये शनाया आर्या हिने कांस्यपदक (ब्रांझमेडल) अंडर ११ मध्ये ३० मुलींच्या श्रेणीत कनिका चंदन हिने कांस्यपदक आणि अंडर ८+३० मध्ये दक्ष लुल्ला याला रजत (सिल्वर मेडल) मिळाले.
यांचा सत्कार समारंभाचे आयोजन कराटे दो एसोशियन आँफ महाराष्ट्र चे प्रेंसिडेट सलाउद्दीन अन्सारी, जनरल सेक्रेटरी संदिप गाडे, कोषाध्यक्ष संदिप वाघचौरे, हे करत आहेत, कल्याण डोंबिवली कराटे एसोशियन च्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू खेळत असून कल्याण पश्चिम योगीधाम येथे गेल्या १३ वर्षापासून सेसेई विवेक शुक्ला त्यांना प्रशिक्षण देत आहेत, मुलांनी मिळवलेल्या यशाबद्दल शाळेने तसेच परिसरातील नागरीकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



No comments:
Post a Comment