कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकां-याची मृत लाभार्थाच्या घरी भेट, तथपूर्वी शिक्षकांची 'झाडाझडती, तर आरोग्य कर्मचां-यांची खरडपट्टी !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील फळेगाव ग्रामपंचायत हद्दीतील भोंगळपाडा गावातील पंतप्रधान आवास योजनेचा लाभार्थी मुकूल लोंभी याचे नुकतेच निधन झाले आहे, त्या गरीब लाभार्थाच्या कुंटूबियांना धीर देण्यासाठी व त्यांना काही मदत करता येईल का? याची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरीता आज गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी त्यांच्या घरी भेट दिली, तथपूर्वी उशीद जिल्हा परिषद शाळा, फळेगाव शाळा येथील शिक्षकांची चांगलीच "झाडाझडती" घेतली तर फळेगाव येथील आरोग्य उपकेंद्रातील कर्मचां-याची विविध उणीवामुळे खरडपट्टी केली, याशिवाय येथील अंगणवाडीतील 'चिमुकल्याची प्रगती पाहुन सेविका, मदतनीस आणि मुलांचे कौतूकही केले.
कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी हे कर्तव्यनिष्ठतेबद्दल परिसरात चांगलेच परिचित आहेत, काम करणा-यांचे कौतूक व कामचुकारांना शिक्षा याबबत ते जिल्हा परिषदेत सर्वश्रुत आहेत, त्यांनी कल्याण बीडिओ म्हणून पदभार सांभाळल्यापासून त्यांच्या टेबलावर पडून असलेली फाईल कधी दिसून येत नाही, कामांचा निपटारा करण्यात त्यांचा हात कोणीही धरु शकत नाही, तक्रारिंचे ताबडतोब निराकरण करणे, ते मार्गी लावणे याला प्राधान्य देत असल्याने नागरीकांना चकरा मारायची गरज पडत नाही, त्यांच्या कारवाईच्या बडग्यामुळे, अनेक कर्मचारी, ग्रामसेवक घरी बसले आहेत.
त्याच्याच तालुक्यातील फळेगाव ग्रामपंचायत हद्दीतील भोगाळपाडा येथील आदिवाशी लाभार्थी मुकुल लोभी यांनी या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेविरोधात बीडिओंकडे लेखी तक्रार केली होती, यावेळी कारण नसताना या मँडमच्या सांगण्यावरुन ग्रामपंचायतीचा शिपाई यांना घेऊन कल्याण पंचायत समिती कार्यालयात आले होते, तेव्हा लाभार्थाची अवस्था पाहून गटविकास अधिकारी श्री भवारी यांनी त्यांना नोटिस देखील बजावली होती, या लाभार्थाला लाभ मिळावा, त्याचे हफ्ते वेळेवर मिळावेत म्हणून पत्रकार संजय कांबळे हे त्यांना मदत करत होते, मागील त्यांनी केलेल्या तक्रारीत त्याला मोठ्या प्रमाणात शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास झाला होता, माझे घर पुर्ण होण्यासाठी मला घरकुलाचे हफ्ते मिळावेत म्हणून तो सतत खटपट करीत असतानाच नुकतेच त्याचे दुख:द निधन झाले, पत्नी व तीन मुले असा परिवार असलेल्या यांची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक आहे.
त्यामुळे संवेदनशील व कर्तव्यनिष्ठ गटविकास अधिकारी अशोक भवारी,तसेच कार्यतत्पर विस्तार अधिकारी,विशाखा परटोंळे व त्यांचे सहकारी यांच्यामुळे त्याला वेळेवर मदत मिळाली, परंतु अद्यापही मजुरी व शेवटचा हफ्ता राहिल्याने अडचण निर्माण झाली आहे,म्हणून यावर काही उपाय,/पर्याय काढता येईलका यासाठी बीडीओनी आज या भागाला भेट दिली.
यापूर्वी त्यांनी अचानक उशीद जिल्हा परिषद शाळेस भेट दिली ,तेव्हा येथील शिक्षक उशीरा आल्याने, तसेच फळेगाव शाळेतील मुलांना लेखन, वाचन, गणित, येत नसल्याने यांची चांंगलीच झाडाझडती घेतली, अगदी कडक शेरा देऊन सुधारणा न झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला, तसेच उशीद जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचेअध्यक्ष सुरेश गायकवाड यांनाही झापले, तूमचे आहे तेच शिक्षक वेळेवर येत नसतील तर तुम्हाला इतर शिक्षक कशाला पाहिजे, शिक्षकावर तूमचे नियत्रंण नाही,ऐकत धसतील तर तक्रारी करा असे सुनावले, शिवाय फळेगाव आरोग्य उपकेंद्रास भेट देऊन तेथील अनेक गैरसोई बद्दल कर्मचा-यांची खरडपट्टी काढली.
तर बाजूलाच असलेल्या अंगणवाडी केंद्रातील चिमुकल्यांची प्रगती पाहून त्यांच्यात ते रमले, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शाब्बासकी दिली, भोंगाळपाडा शाळेतील मुलांच्या लेखन, वाचन बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले, या सर्व कामचुकार कर्मचां-याना नोटिस बजावण्यात येणार असल्याचे गटविकास अधिका-यांनी सांगितले.
बीडिओच्या अशा अचानक भेटीमुळे शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांची चांगलीच ताराबंळ, धावपळ, उडाली असून यातील काहीची चौकशी झाल्यावर निलबंनाची कारवाई करण्यात येईल असे सुतोवाच गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी दिले, या भेटीमुळे नागरीकांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण पसरले आहे.






No comments:
Post a Comment