*खाऊची बीले दहा दिवसांत मिळणार!*
चोपडा, प्रतिनिधी.. अंगणवाडी कर्मचारी यांना गेल्या ५ वर्षी पासून देणेत आलेले मोबाईल कमी जी बी चे असून नित्कृष्ट निघाले आहेत म्हणून वारंटी/ गरंटी संपलेल्या मोबाईल (बोंबल्या) वापसी आंदोलन ३ जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनापासून राज्यभर पुन्हा सुरू झाले आहे*
*जळगाव जिल्ह्यात चोपडा येथुन सुरूवात*
म्हणून ६ जानेवारी २३पासून जळगांव जिल्ह्यातही चोपडा येथे मोबाईल वापसी आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. प्रथम अल्पबचत भवन येथून अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक जळगाव जिल्हा अध्यक्ष कामगार नेते का अमृत महाजन वत्सला पाटील शोभाताई नेवे, अश्विनी देशमुख, शशिकला निंबाळकर, देवेश्री बाविस्कर, प्रतिभा भदाने, ममता महाजन, सुरेखा पाटील, पुशपावती मोरेे, संगीता पाटील, कविता सोनवणे यांचे नेतृत्वात चोपडा प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला
त्यावेळी ६ बीटां चे एकुण १२० मोबाईल प्रकल्प कार्यालयाचे वतीने रत्नाबाई पाटील यांनी जमा करून घेतले. *हा चोपडा तहसीलदार कार्यालयावरही हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता पण तहसीलदार गावित यांनी प्रकल्प अधिकारी पी डी धनगर यांना सकाळी १० वाजता बोलावून.निवेदनात समर्पक उत्तर द्यावे सुचवले* असता श्री धनगर यांनी मोबाईल साठी १००००₹ देणे ,नवीन मोबाईल देणे, मानधन वाढबाबत शासनास कळवत आहोत तसेच सेवानिवृत्त सेविका मदतनीस थकीत सेवानिवृत् लाभात बाबत स्थानिक व जिल्हा स्तरावरील कार्यवाही पूर्ण झाली आहे पण आयुक्त स्तरावर व एल आय सी कडे सेवानिवृत्ती लाभ प्रकरणे प्रलंबित आहेत असे सांगून आठ महिन्यांची खाऊची बिले १० दिवसात मिळतील असे लेखी सांगितले.
*बहिष्कार आंदोलन सुरूच राहील . कॉम्रेड अमृत महाजन यांचा इशारा*
या मोर्चा आधी अल्पबचत भवन मध्ये सेविका मदतनीस यांची सभा झाली .त्यात मार्गदर्शन करताना का महाजन म्हणाले की, वारंटी गॅरंटी संपलेल्या भ्रमणध्वनीवर इंग्रजी अप वरून पोषण ट्रकर न भरणे. एम पी आर न देणे.. आधार सिडिंग कामांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे, मराठी तारका पोषण ट्रॅकर अॅपबाबत मे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे सांगून मोबाईल वापसी. आंदोलन नंतर सेविका ना भ्रमणध्वनी परत नेणेसाठी कार्यालयीन दडपण वा जाच सहन केले जाणार नाही असा इशारा दिला व मोबाईल वापसी 20 जानेवारी पर्यंत सुरू रहाणार आहे अशी माहिती देऊन जानेवारीच्या अखेरीपर्यंत शासनाने मानधनवाढ, नवीन मोबाईल व इतर महत्त्वाच्या प्रश्नांबाबत युनियनच्या नेत्यांशी चर्चा न केल्यास अंगणवाडी सेविका व मदतनीस बेमुदत संपावर जाणार असा इशारा ही त्यांनी दिला मोर्चा तर सेवानिवृत्त सेविका व मदतनीस खाऊ शिजवणाऱ्या बचत गटाच्या महिला ही सहभागी झाले होते आंदोलन दरम्यान कर्मचारी यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
We just don't want mobile we want as goverment employe,good increment and pension
ReplyDeleteGovernment just can't handover mobiles and make us quite
ReplyDelete