रिकेलिब्रशन न केलेल्या रिक्षांना नित्यरोज पन्नास रुपये दंड रद्द करा - आप रिक्षा - टॕक्सी वाहतूक संघटना
*मिटरची सक्ती बंद करा*
रिक्षा मिटर तपासणी न केलेल्या रिक्षांना रोज पन्नास रुपये दंड, रिक्षा मिटर तपासणी पासिंग सर्व रिक्षा गांधारी येथे करण्याचा निर्णय व मिटर रिकेलिब्रशन या विषयासंदर्भात श्रमिक विकास संघटन (लेबर ट्रेड युनियन), या संघटनेच्या अंतर्गत *आप रिक्षा - टॕक्सी वाहतूक संघटना* अध्यक्ष (कल्याण डोंबिवली शहर) निलेश व्यवहारे व निलम व्यवहारे तसेच पदाधिकारी यांनी आरटीओ कार्यालयात जाऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांची भेट घेतली..
संपूर्ण एम एम आर डि ए रिजन अंतर्गत असलेल्या सर्व रिक्षा चालकांना १५ जानेवारी पर्यंत मिटर रिकेलिब्रिशन करण्याची मुदत दिली होती तरी कल्याण डोंबिवली शहरातील अनेक रिक्षांचे मिटर रिकेलिब्रिशन बाकी असून सध्या त्यांना मुदत संपल्यावर त्यांना नियमानुसार रोज ५० रुपये प्रमाणे दंड आकारला जात आहे तसेच पासिंग नांदिवली येथे तर मिटर तपासणी गांधारी येथे या मुळे रिक्षा चालकांना नाहक वेळ जाऊन आर्थिक नुकसान सुध्दा होत असल्याने या संदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांना निवेदन देऊन चर्चा केली असता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांनी सांगितले रिक्षा मिटर रिकेलिब्रशन न केलेल्या रिक्षांना नित्यरोज पन्नास रुपये प्रमाणे दंड आकारणी आमच्या आधिकार कक्षेत येत नाही तरी नित्य रोज-५०.रुपये प्रमाणे दंड टाळण्याकरीता विनाविलंब मिटर रिकेलिब्रेशन व मिटर तपासणी पांसिग करण्याचे आवाहन केले जेणेकरुन रोज पन्नास रुपये दंड आर्थिक भुर्दंड व मनस्ताप सोसावा लागणार नाही.
श्रमिक विकास संघटन (लेबर ट्रेड युनियन), या संघटनेच्या अंतर्गत *आप रिक्षा - टॕक्सी वाहतूक संघटना* अध्यक्ष (कल्याण डोंबिवली शहर) निलेश व्यवहारे व निलम व्यवहारे यांनी आयुक्त कार्यालयात निवेदन देऊन रिक्षा मिटर रिकेलिब्रिशन नित्य रोज-५०.रुपये दंड आकारणी निर्णय रद्द करणे संदर्भात तोडगा काढण्यात येईल असे सांगितले.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी तसेच अनेक रिक्षा मालक व चालक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment