Sunday, 22 January 2023

कॉंग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापन दिनानिमीत्त्त औरंगाबाद शहरातील ११५ वार्डामध्ये महाआरोग्य शिबीराची सुरुवात !

कॉंग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापन दिनानिमीत्त्त औरंगाबाद शहरातील ११५ वार्डामध्ये महाआरोग्य शिबीराची सुरुवात !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २२ : कॉंग्रेस पक्षाच्या स्थापना दिवसाचे औचीत्य साधुन पक्ष कार्यालय गांधी भवन येथे औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
 
आज रोजी महाआरोग्य शिबीराची सुरुवात छावणी वार्ड क्रमांक 5 पासुन सुरुवात करण्यात आली. हे आरोग्य शिबीर औरंगाबाद शहरातील ११५ वार्ड मध्ये त्यामध्ये मोफत तपासणी, औषधी मोफत, देण्यात येणार आहे. छावणी येथे महाआरोग्य शिबीराचे उदघाटन औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी महापौर अशोक यादव सायन्ना तर शेख अशफाक डिलक्स, महाआरोग्य शिबीर संकल्प तथा आयोजक कु.दिपाली लालाजी मिसाळ तसेच शिबीर वैद्यकीय भागीदार डॉ.सरताज पठाण, डॉ.पवन डोगरे, डॉ.अंजली पवन डोंगरे, यांच्या संयुक्त विदयमानाने ११५ वार्डात राबविण्यात येणार आहे. यावेळी अनिस पटेल, प्राचार्य प्रकाश वाघमारे, कैसर बाबा, विभाताई मगरे, सरोज जेकब, निर्मला शिखरे, सलीम शेख,मन्सूर सर, अलंकृत येवतेकर, मुददसिर अन्सारी, आकाश, छावणी वार्डातील कॉंग्रेस आदी पदाधिकारी व कार्यकर्त्ये उपस्थित होते. या कार्यकमाचे वॉर्ड  आयोजन आसमत खान अध्यक्ष परिवहन विभाग औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी यांची केले होते.

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...