Tuesday, 10 January 2023

युपी येथील वृध्द मोहम्मद फारूक यांना जिन्सी पोलिस ठाणे व माणुसकी समूहाने दिला हक्काचा निवारा !

युपी येथील वृध्द मोहम्मद फारूक यांना जिन्सी पोलिस ठाणे व माणुसकी समूहाने दिला हक्काचा निवारा !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १० : वृध्द पुरुष मोबीन फारूक वय ८५ वर्ष हे बेवारस अवस्थेत जीन्स-हद्दीत आढळून आले. ते गेल्या ७ वर्षापासून विपन्न अवस्थेत भटकत होते , या व्यक्तीस जुमान आमेर यांनी मदत करून पोलीस ठाणे जीन्स येथे मदतीसाठी घेऊन आले असता सदर इसमाची पोलिसांनी विचारपूस केली. त्यांनी आपला पत्ताः बदलू हाजी अली नगर लालगंज राय बरेली उत्तर प्रदेश सदर वृध्द इसमाने आपल्या नातेवाईकांचा संपर्क पोलिसांना दिला असता पोलीसांनी नातेवाईकांशी फोन द्वारे संपर्क साधला असता फोनवर  त्यांचा मुलाने फोन उचलला, त्याने सांगितले की हमारे पिताजी ने हमारे लिए कुछ भी नही किया उनका और हमारा अब कोई भी रिश्ता नही है , हम उनको नंही संभालेंगे असे त्याने सांगून फोन ठेवून दिला सदर इसमास आता काय करायचे ? म्हणून त्याच्या पुनर्वसनासाठी पोलीस निरीक्षक ए. आर. भंडारे यांनी समाजसेवक सुमित पंडित यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सदरील इसमाच्या तात्पुरत्या  निवाऱ्याची व्यवस्था आपल्या वृद्ध सेवालयात करण्याची विचारणा केली. 

सदरील परिस्थिती चे गांभीर्य ओळखून जिन्सी पोलीस ठाण्यात येऊन सदरील वृद्धास आस्थेवाईक चौकशी करुन धिर दिला त्या मुळे त्या वृद्धाने स्वतःहून वृद्ध सेवालय येथे राहण्यास होकार दिला सदरील वृद्ध इसमास अन्न वस्र निवारा देण्यास संमती दर्शवून सुमित पंडीत यांनी  कायदेशीर कागद पत्रांची पुर्तता करुन, सदर वृध्दास अन्न वस्त्र निवारा याकरिता माणुसकी वृद्ध सेवालय येथे नियमाप्रमाणे दाखल करून घेऊन घेतले. व सदर इसमाचे नातेवांईकांचा शोध घेऊन त्यांचे मन वळवूनत्यांना लवकरच त्यांच्या गावी पोहचवण्याचीव्यवस्था माणुसकी समुहाची टिम प्रयत्न करत आहे.

या मदत कार्यासाठी पोलीस निरिक्षकए.आर.भंडारे, साहाय्यक पोलीस निरीक्षक मगरे, पोलीस उप निरिक्षक तायडे, पोलीस कर्मचारी व माणुसकी समुहाचे समाजसेवक सुमित पंडित व समाजसेवीका पुजा पंडित, रंजना प्रशांत दंदे यांनी मदतकार्य केले.

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...