ठाण्याच्या खाडी परिसरात परदेशी पाहुणे रोहीत पक्षी दाखल, पाहण्यासाठी पक्षी प्रेमिंची एकच गर्दी !
भिवंडी, दि,१०,अरुण पाटील, (कोपर) :
ठाण्याच्या खडी किनारी रोहीत (फ्लेमिंगो) पक्षांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले असून या पक्षाचे मराठी नाव रोहीत असून हे पक्षी बगळ्यांच्या वंशातील असून या परदेशी पाहुण्यांना बघण्यासाठी पक्षीप्रेमी नागरिक दर वर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. हवामानातील बदल, प्रजनन, व मुबलक प्रमाणावर मिळणारे अन्न त्यामूळे हजारो किलोमीटरचा प्रवास करून रोहीत (फ्लेमिंगो) पक्षांसह ईतर देश विदेशातील विविध पक्षांचे आगमन ठाण्यातील खाडी परिसरात होत असते.
मात्र सध्या कित्येक वर्षापासून ठाण्यातील खाडीत व खडीलगत बांधकामासाठी माती भराव केला जात असल्याने खडी किनाऱ्याचे क्षेत्रफळ कमी कमी होत चालल्याने भविष्यात रोहीत पक्ष्यासह ईतर पाहुणे पक्ष्यांना खाद्य कमी मिळू लागल्यास यांचे.येण्याच्या संख्येत घट होण्याची चिंता पक्षी प्रेमिकडून व्यक्त केली जात आहे.
हिवाळ्याची सुरुवात झाली की अनेक परदेशीय पाहुणे ठाणे खाडीत भेटीसाठी येत असतात. हे पाहुणे हजारो मैल दूर प्रवास करून येत असून लाखोंच्या संख्येने आपल्याला ठाणे शहरालगत असलेल्या खाडीमध्ये पाहण्यास मिळत आहे.
अनेक वेळा फ्लेमिंगो पक्षी आपल्याला परदेशात पहायला मिळतात. तर थंड हवेच्या ठिकाणी राहणे हे पक्षी पसंत करतात. प्रत्येक वर्षी हिवाळाच्या सुरुवातीला असंख्य फ्लेमिंगो पक्षी देशात विविध ठिकाणी दाखल होत असतात. या फ्लेमिंगो पक्षांसोबत 200 हून अधिक विविध जातींचे पक्षी हे खाडीकिनारी आढळून येतात.
फ्लेमिंगो पक्षी यांना योग्य प्रमाणात खाद्यपदार्थ या खाडीकिनारी मिळत असून हे पक्षी प्रामुख्याने याच ठाणे खाडी किनाऱ्यात आढळतात. तर चार ते पाच महिन्याचा वास्तव्य त्यांचे या खाडी किनारी असते. याच पाहुण्यांना पाहण्यासाठी अनेक पर्यटक हे या ठिकाणी येत असतात. फ्लेमिंगो पक्षांचा रंग त्यांचा आकार त्यांचे उडण्याची पद्धत विशेषतः सर्वच गोष्टी या पर्यटकांना मनमोहक असा आनंद देतात. त्याच खाडी परिसरात विहार करणाना प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळत आहे.
ठाणे शहरात, खाडी परिसरात या हिवाळ्याच्या काळात फ्लेमिंगो, सीगल आणखीन इतर विदेशी पाहुणे थंड वातावरणामुळे येतात. त्यामुळे ही खाडी पक्षीप्रेमींना आनंद देते. अनेकदा विदेशी पर्यटक या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी या भागात येतात. सरकारने याच बाबीला विशेष महत्त्व दिले असून खास फ्लेमिंगो पार्क देखील उभारले आहे.
No comments:
Post a Comment