Friday, 24 February 2023

स्वखर्चाने रंगवीले कडु कुटुंबीयांनी गतीरोधक !

स्वखर्चाने रंगवीले कडु कुटुंबीयांनी गतीरोधक !

*गतीरोधक न दिसल्यामुळे गमवावा लागला जीव*

जव्हार, जितेंद्र मोरघा -

मोखाडा तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतचे सरपंच देवराम कडू यांना अनाधिकृत गतिरोधकामुळे आपला जीव गमवावा लागला, तसेच जे गतिरोधक रस्त्यांवर आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचे कलर नाहीत जेणेकरुन गतिरोधक लांबुन दिसावा आणि त्यातच रस्त्यावर गतिरोधक फलक नसल्यामुळे पुढे गतिरोधक आहे वाहने हळू चालवा असे फलक नसल्यामुळे आणखी कोणावर असा प्रसंग येऊ नये यासाठी शासकीय यंत्रणेची मदत न घेता कै. देवराम कडू  यांचे सुपुत्र आकाश कडू व त्यांचा मित्र परिवार यांनी स्वतः खर्च करून गतिरोधकांना रंग दिला यामुळे वाहन चालकास गतिरोधक लांबून दिसावा व अपघात टळावा. जेणेकरून कडू कुटुंबावर जो प्रसंग ओढवला तसा प्रसंग दुसऱ्या कुटुंबावर ओढवू नये व कुणाचीही अशी हानी होऊ नये .

No comments:

Post a Comment

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा !

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा ! पुणे, प्रतिनिधी : आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आ...