परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण व्हा - प्रदीप वाघ
जव्हार, जितेंद्र मोरघा :-
वाकडपाडा हायस्कूल येथे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आशिर्वाद देताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की, आपल्या जीवनातील काही महत्त्वाच्या क्षणा पैकी एक क्षण जो आयुष्यात महत्वाचा असुन आपले भविष्य घडवु शकतो तो म्हणजे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत मिळविलेले यश.
आपण आपल्या पाया वर उभे राहून, आपल्या परीवारा बरोबर समाजाच्या विकासासाठी मोलाचे योगदान देण्याचा प्रयत्न करवा या साठी आत्मविश्वास व कुठलाही ताण न घेता या परीक्षेला सामोरे जा असेही ते यावेळी म्हणाले प्रदीप वाघ हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख पाहुणे म्हणून अमित नारकर मुख्य कार्यकारी अधिकारी आरोहन यांनी देखील मुलांना शुभेच्छा देताना सांगितले की, आपण पुढे जात असताना आपल्या सोबतच्या मित्रांना देखील बरोबर घेऊन चला स्पार्क फाउंडेशन चे प्रकल्प अधिकारी श्री नितीन पिठोले यांनी सांगितले की आपण गरीबीत जरी जन्माला आलो तरी शेवटच्या काळात श्रीमंत झालो पाहिजे.
यावेळी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले व शाळा आणि शिक्षकां विषयी बोलताना भावुक झाले, या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक चुनिलाल पवार, शाळेचे मुख्याध्यापक ठवरे सर, माजी सरपंच संजय वाघ, उपसरपंच नंदकुमार वाघ, शालेय समिती सदस्य परशुराम गवारी, आरोहनच्या तमन्ना, पोलिस पाटील विठ्ठल गोडे, पांडवीर चौधरी, झुगरे सर, कांचन हमरे, कातवारे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment