Monday, 24 April 2023

कांबा पावशेपाडा येथील शेतकऱ्यांचा येत्या गुरुवारी आत्मदहनाचा इशारा, ८४ (क) ला पात्र जमीनीचा फेरफार कसा नोंदवला ?

कांबा पावशेपाडा येथील शेतकऱ्यांचा येत्या गुरुवारी आत्मदहनाचा इशारा, ८४ (क) ला पात्र जमीनीचा फेरफार कसा नोंदवला ?

कल्याण, (संजय कांबळे) : बोगस शेतकरी दाखला जोडून खरेदी केलेली जमीन कल्याण तहसीलदार यांनी सुनावणी दरम्यान ८४(क) ला पात्र ठरवली असताना मंडल अधिका-यांनी मात्र 'आर्थिक मलिदा' घेऊन या जमीनीचा फेरफार नोंदवला, या विरोधात कांबा पावशेपाडा गावातील स्थानिक शेतकरी संजय जनार्दन भोईर यांनी या विरोधात तक्रार दाखल केली. परंतु याची दखल न घेतल्याने अखेरीस येत्या गुरुवारी म्हणजे २७ एप्रिल रोजी कल्याण तहसील कार्यालया समोर अंगावर राँकेल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
कांबा ग्रामपंचायत हद्दीत अनेक परप्रांतीयांनी शेकडो एकर जमीनी खरेदी केल्या आहेत. अशाच एक असलेल्या सर्व्हे नंबर १२५ च्या जमीनी खरेदी विरोधात येथील काही शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. याची सुनावणी कल्याण तहसील कार्यालयात सुरू होत्या. 

तहसीलदार कल्याण यांनी ही जमीन म्हणजे सर्व्हे नं १२५ चा निर्णय दिला.

२० जानेवारी २०१६ मध्ये सदर जमीन ८४(क) म्हणजे सरकार जमा करणेचा पात्र ठरविण्यात आली. तरीही मंडळ अधिकारी श्री पवार यांनी फेरफार क्रमांक ३९२७ नोंदवून घेतला. त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप स्थानिक शेतकरी असलेल्या संजय भोईर यांनी केला. सध्या या जागेवर मातीची भरणी झाली असून यामुळे नैसर्गिक नालाही बुजविण्यात आला आहे. याविरोधात त्यांनी १६ फेब्रुवारी २०२३ रोजी कल्याण तहसील कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे.

मात्र अद्यापही याची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने  शेतकरी संतापले आहेत. त्यामुळे पावशेपाडा गावातील संजय जनार्दन भोईर यांनी येत्या गुरुवारी म्हणजे २७ एप्रिल ला  कल्याण तहसील कार्यालयासमोर अंगावर राँकेल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत आमच्या प्रतिनिधीनी कल्याण तहसीलदार जयराज देशमुख यांना भेटून विचारणा केली असता मी ताबडतोब मंडळ अधिकारी यांना लक्ष घालून चौकशी करून जबाब घेण्याच्या सुचना दिल्या असल्याचे सांगितले. तर शेतकरी संजय भोईर यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही इथले स्थानिक शेतकरी आहोत, आमची कामे होत नाही, मात्र इतर बोगस लोकांची बोगस कामे तात्काळ होतात ती काय सेवेच्या भावनेतून होतात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...