वाळवा तालुक्यात 'आनंदाचा शिधा', चा काळाबाजार, महसूल विभागाचे दुर्लक्ष, रेशन दुकानदर म्हणतो कागदपत्रे नाहीत !
ठाणे, (प्रतिनिधी) : राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मोठा गाजावाजा करुन गोरगरिबांना महागाईतून थोडासा दिलासा मिळावा म्हणून गुढीपाडवा व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त केवळ १०० रुपयात 'आनंदाचा शिधा', देण्याची घोषणा केली, त्याचे वितरण सार्वजनिक व्यवस्थेअतंर्गत करण्यात आले काही ठिकाणी तो मिळाला देखील परंतु बहुतांश ठिकाणी त्याचा काळाबाजार झाल्याचे समोर येत आहे. असाच प्रकार वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येते समोर आला आहे. त्यामुळे महसूल विभाग काय करतोय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सध्या राज्यात महागाने उच्चांक गाठला आहे, गँस, पेट्रोल, डिझेल, जीवनावश्यक वस्तू, यामुळे सर्वसामान्य जनता या सरकारला वैतागली आहे, यातून मार्ग काढण्यासाठी, नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील गोरगरीब जनतेचा गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती गोड व्हावी म्हणून केवळ १०० रुपयांत 'आनंदाचा शिधा', देण्याचा निर्णय घेतला.
परंतु शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तो गुढीपाडव्याला मिळाला नाही, यावर विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा शिधा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या आत मिळेल अशी घोषणा केली. त्यानुसार यंत्रणा कामाला लागली. आता तरी वेळेत शिधा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत असताना वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रूक गावातील वयोवृद्ध महिला श्रीमती पवित्राबाई जयवंत कांबळे (८५) या राहत्या घरापासून दिड ते दोन किलोमीटरवर अंतररावर असलेल्या प्रकाश माळी या रेशन दुकानदराकडे सकाळी ८:३० वा गेल्या असता,' तुमचे नाव यादीत आले नाही, तुम्ही कागदपत्रे जमा केली नाहीत, त्यामुळे तुम्हाला आनंदाचा शिधा मिळणार नाही, शिल्लक राहिला तर पुढच्या महिन्यात देऊन असे बोलून त्यांना जाण्यास सांगण्यात आले. श्रीमती पवित्राबाई कांबळे यांचे रेशनकार्ड हे प्राधान्य कुटूंब लाभार्थी असे असताना सदर रेशन दुकानदर शिधा नाकारु कसा शकतो? हा खरा प्रश्न आहे, शिवाय हा दुकानदार या महिलेच्या समोर इतरांना मात्र आनंदाचा शिधा देत होता,
याहूनही आश्चर्य म्हणजे, हा दुकानदार दुकान बंद ठेवून काही दिवस देवदर्शन करण्यासाठी गेला होता, ही महिला बिचारी, २/३ किलोमीटरवर अंतर तुडवत येरजा-या मारत होती. या संदर्भात या भागाचे मंडल अधिकारी राजेंद्र पाटील यांना हा प्रकार सांगितला मात्र त्यांनी ही समाधानकारक उत्तर देण्यास असमर्थता दर्शविली, त्यामुळे वाळवा तालुक्यात आंनदाचा शिधा या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरकारभार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या बाबतीत श्रीमती पवित्राबाई कांबळे या वयोवृद्ध आजीचा मुलगा संजय कांबळे यांना विचारले असता ते म्हणाले, आनंदाचा शिधा यामध्ये चणा डाळ, रवा, साखर व खाद्यतेल असे जिन्नस असतात, मात्र या दुकानदाराकडून इतरही धान्य दिले जाते का की तेही काळाबाजारात विकतो याची चौकशी करून, या विरोधात आपण लेखी तक्रार करणार असून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देऊन हा भोंगळ कारभार त्यांच्या लक्षात आणून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment