Sunday, 23 April 2023

*"पितळखोरा_लेणी"*

*"पितळखोरा_लेणी"* 

अशी एकमेव लेणी जी दरीत आहे.

महाराष्ट्र राज्य तसा देश विदेशात काळ्या कातळात खोदलेल्या लेण्यांच्या करीता प्रसिद्ध आहे. हजारो लेणींच्या श्रृंखला इथे डोंगर माथ्यावर विखुरलेल्या आहेत.

त्यातच प्रत्येक लेणी आपले वैशिष्ट्ये बाळगून आहेत. भिक्खू संघाच्या निवास स्थानासाठी, अध्ययनासाठी या लेण्यांचा वापर होत होता. सुरवातीच्या लेण्या या खूप साध्या सुबक पद्धतीच्या होत्या, नंतर शिल्पकलेचा जस जसा विकास होत गेला तशी लेण्यात श्रृंगारीकता येत गेली.

हजारो लेणीत आपले एक वेगळे स्थान एका लेणीने जपले आहे आणि ती म्हणजे "पितळखोरा लेणी".‌‌ सगळ्या लेण्या या डोंगरावर असतात पण ही एकमेव अशी लेणी आहे जी दरीत आहे. 

गोताळा जंगलात दरीच्या कुशीत ही लेणी आहे. 

शिल्पकलेचे उत्तम कारागिरी इथे पाहायला मिळते तसेच अजिंठा लेणीत ज्या पद्धतीने भित्तीचित्रे आहे त्याच पद्धतीचे चित्रे इथे पाहायला मिळतात, या लेणीच्या शिल्पकलेवर ग्रीकांची छाप जास्त प्रमाणात दिसून येते , तशी शिल्पकलेचे ज्ञान आपल्याला ग्रीकांकडूनच मिळाले आहे. तसेच अचंबित करणारी जल व्यवस्थापन देखील पाहायला मिळते. 

इतर लेणीवर पाहायला न मिळणारी एक गोष्ट इथे पाहायला मिळते, ती म्हणजे डोंगर कपारीतून कोसळत येणारे पावसाचे पाणी इथे चक्क वळवून चार नागांच्या फण्यातून बाहेर पडते, फवारा थेट आपल्या पायावर पडतो, ही जल व्यवस्थापन फक्त "पितळखोरा लेणीतच" पाहायला मिळते. 

आपला जाज्वल्य इतिहास आपल्या पूर्वजांनी सढळ हाताने केलेल्या दानांनी तयार झालेला हा भारतीय अमुल्य ठेवा आपली वाट पाहतोय.. आसुसलेल्या नजरेने तो तुमच्या प्रतिक्षेत आहे , जीर्ण झालेली ही ऐतिहासिक स्थळे शेवटच्या घटका मोजतायत..... त्या नामशेष होण्या आधी पाहून या. 

तर मग कधी जाताय ही लेणी आणि तिथले जल व्यवसापन पाहायला....? 

टिप : पितळखोरा लेणी कडे जाण्याचे मार्ग : 

१. औरंगाबाद पासून चाळीसगाव च्या रस्त्याला कन्नड पासून ८ किलोमीटर वर कालीमठ फाटा आहे. या कालीमठ फाट्यापासून पुढे ४ किलोमीटर वर अंबा फाटा आहे. आणि अंबा फाट्यापासून पुढे ४ किलोमीटर वर गौताळा अभयारण्याचे प्रवेश द्वार आहे. अभयारण्याच्या प्रवेश द्वारापासून अर्धा किलोमीटर वर लेणी च्या पायऱ्या आहेत . अंदाजे १५ ते २० मिनिटे पायऱ्यांवरून उतरल्यावर तुम्ही लगेच लेणीमध्ये उतरता.

स्वताचे वाहन नसेल आणि एसटी ने जायचे असेल तर औरंगाबाद पासून चाळीसगाव ची एसटी पकडावी व कन्नड च्या पुढे कालीमठ फाट्यावर उतरावे. कालीमठ फाट्यापासून अंबा फाट्यापर्यंत जाण्यासाठी खाजगी शेअर रिक्षा किंवा जीप मिळतात. त्या प्रत्येकी वीस रुपये घेऊन अंबा फाट्यापर्यंत सोडतात. तिथून पुढे मात्र चार किलोमीटर चालत जावे लागते कारण शेअर रिक्षा किंवा जीपला पॅसेंजर मिळत नसल्यामुळे पुढे जात नाहीत .  

२. चाळीसगाव पासून अंदाजे १५ किलोमीटर वर पाटणादेवी मंदिर आहे . आणि पाटणादेवी मंदिरापासून २ ते अडीच किलोमीटर वर पितळखोरा लेणी आहेत . परंतु या मार्गाने गेल्यास २ ते अडीच किलोमीटर ची खडी डोंगर चढाई आहे . व ती करताना दमछाक होऊ शकते. तसेच गौताळा अभयारण्य असल्यामुळे वन्य जीव भेटण्याचीही शक्यता आहे .

लेणी पर्यंत जाण्याची माहिती मनोज ओव्हाळ सरांनी पुरवली आहे. 

"सूरज रतन जगताप"
मुक्त लेणी  अभ्यासक 
घणसोली ,नवी मुंबई

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...