माळशेज घाटात वसलेल्या 'आंबेमाळी, गावास तब्बल सत्तर वर्षानंतर रस्ता मिळणार ! आनंद व्यक्त करावा का दु:ख ?
कल्याण, (संजय कांबळे) : केंद व राज्य सरकार स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाचा टेंभा मिरवत आहे, अमृतमहोत्सवी वर्षे म्हणून देशभर प्रसिद्धी करत आहे. परंतु मुंबई पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या व नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या माळशेज घाटात वसलेल्या, आंबेमाळी'या गावाच्या रस्त्याच्या कामाचा नुकताच शुभारंभ झाला आहे. परंतु यासाठी येथील लोकांना तब्बल ७० वर्षे वाट पहावी लागली, त्यामुळे आता रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाल्याने आनंद व्यक्त करायचा की ७० वर्षे विनारस्ता अनेक दु:ख, वेदना, अडचणी भोगल्या ते आठवत बसायचे असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.
कल्याण नगर महामार्गावर माळशेज घाट हे पर्यटन स्थळ आहे, अगदी निसर्गाने मुक्त हस्ते येथे नैसर्गिक सौदर्याची उदळण केली आहे. उंच उंच पांढरेशुभ्र धबधबे, घनदाट जंगलातून वाहणारे ओहळ, धुक्यामुळे निर्माण झालेले दृश्य, वेगळे पक्षी प्राणी, आदीमुळे माळशेज घाट पर्यटकांचे मुख्य स्थळ बनले आहे.
अगदी मुंबई पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या घाटात अनेक आदिवासी वाड्या वसत्या वसलेल्या आहेत. येथील फांगुळगव्हाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आंबेमाळी या गावास गेल्या ७० वर्षांपासून रस्ताच नव्हता, माळशेज घाट मुख्य महामार्गापासून म्हणजे चिंचवाडी फाट्यापासून अडिज ते तीन किलोमीटर अंतरावर आंबेमाळी हे सुमारे ५० लोकवस्तीचे गाव वसले आहे, येथे रस्ताच नसल्याने इतर सोईसुविधा बाबत न बोललेले बरं? कधी कोणी आजारी पडले तर पेंशटंला डोलीत घालून दवाखान्यात न्हावे लागत होते. पत्रकार संजय कांबळे यांनी मागील महिन्यात या संदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती.
अखेर फांगुळगव्हाण ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामसेवक बाळू कोकणे, यांनी सतत पाठपुरावा करून पेसा निधी मधून या पायवाटेवर असलेले मोठमोठे धस काढून मातीभराव, गटार करणे आदी कामाचा शुभारंभ नुकताच झाला. यावेळी उपस्थित आर बी भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी टोकावडे दक्षिण, इंदवीताई तुळपूळे, श्रमिक मुक्ती संघटना, डि बी जाधव, वनपरिमंडळ अधिकारी, मोरोशी, एस एस मेगांळ, वनरक्षक थितबी, जे आर भला, वनरक्षक सावर्णे, ऐ एस गायकवाड वनरक्षक दिवाणपाडा, ई,एस वाघ वनरक्षक भोंराडी, या अधिकारी व कर्मचारी यांनी विषेश प्रयत्न करून हा वनहक्क प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल फांगुळगव्हाण ग्रामपंचायतीचे सरपंच सविता भला, उपसरपंच राजू भला, सदस्य पांडुरंग साबळे, विठ्ठल भला, तानाजी भला, मनिष कारभळ, लक्ष्मी भला, विमल पोकळा, मंदा सांगडे दगडामाट खाकर आदींनी त्यांचे आभार मानले.
तर या प्रंसगी संजय पवार, मा जिप सदस्य, प्रकाश पवार, अनिल घरत, मा. पस सदस्य, गोंविद भला मा. जिप सदस्य, सुरेश उघडा, संचालक, कृ उ बा स मुरबाड, बाळू कोरडे, मा सरपंच, शंकर भला, समाजसेवक, सोनू पोकळा, किरन कारभळ, गणेश सांगडे, लाड्याजी मेंगाळ, खाकरसर, या सर्वांनी रस्त्याच्या पुर्णत्वासाठी सहकार्य करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे बघू आता ७० वर्षानंतर तरी येथील येथील ग्रामस्थांना 'वेगवान निर्णय गतिमान सरकारचा काही फायदा होतो का?
No comments:
Post a Comment