दशनाम गोसावी समाजाचा राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १६ : महा दशनाम गोसावी सामाजिक संस्थे अंतर्गत दशनाम गोसावी समाजातील अविवाहित घटस्फोटीत विधुर विधवा उमेदवारांसाठी राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील मेळावा भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र टीव्ही सेंटर रोड औरंगाबाद येथे दिनांक 28 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे सदरील मेळाव्यास मुले व पुरुष यांच्यासाठी सभासद शुल्क ठेवण्यात आले असून महिलांसाठी पूर्णपणे मोफत सभासद नोंदणी आहे तरी सर्व इच्छुक उमेदवारांना जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष योगेश गुलाबराव बन, सचिव वामन गिरी, सहसचिव कैलास गिरी प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण गिरी, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब भारती, विभागीय संपर्क प्रमुख वसंत गोसावी महिला मराठवाडा अध्यक्ष सुमित्रा गिरी, निमंत्रक विलास गिरी, मुकेश पुरी, राजकुमार गिरी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9545308888 या क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
No comments:
Post a Comment