कानडावू विठ्ठलु कर्नाटकू !! जनतेने भाजप आरएसएसची द्वेषाची दुकानदारी नाकारली !! *कॉम्रेड अमृत महाजन, चोपडा*
(कर्नाटक विधानसभा निवडणूक विश्लेषण)___
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कानडी जनतेने निर्णायक जनादेश काँग्रेसला देऊन, भाजप-आरएसएस च्या द्वेषाचे आणि विभाजनाचे राजकारण याला ब्रेक लावला आहे. माजोरी सत्ताधारी व हुकुमशाही राजवट यांना जनता च पुरून उरते हे या निवडणुकीने अधोरेखित झाले.
या निवडणुकीत पंतप्रधान मोदी-गृहमंत्री शहा या जोड गोळीच्या मोहिमेने जनतेच्या मुख्य मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि जातीय ध्रुवीकरणावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले. ईशान्य भारतात मणिपूर जळत असता व दिल्लीत जंतर मंतर वर जागतिक स्तरावर भारतासाठी खेळणाऱ्या कुस्तीगीर महिला यांची विनयभंग व बलात्कार करणाऱ्या भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांचेवर गुन्हा दखल व्हावा. म्हणून त्या १५/२० दिवसापासून उपोषण करीत आहेत, त्याकडे निर्दय पणे लक्ष न देता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे कर्नाटक स्वारीवर वारंवार निघत होते. जनतेत फूट पाडून कोणत्याही प्रकारे निवडणूक जिंकायची या इर्षेने ते पेटले होते. कर्नाटकचे दुधात गुजरातचे अमुल दूध घुसविण्याचा प्रयत्न ही करत होते.. 2018 मध्ये कर्नाटकात या आधीही काँग्रेस व जनता दल यांचेच सरकार आले होते. पण भाजपने त्यांचे आमदार फोडून स्वतःचे सरकार स्थापन केले. मध्यप्रदेशातही काँग्रेस फोडली तेथेही सरकार स्थापन केले. तसेच महाराष्ट्रातही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असे महाविकास आघाडीचे सरकार बऱ्यापैकी काम करीत असताना, शिवसेनेला फोडून भाजप सह सरकार उभे केले राज्यपाल यांची मदत घेतली. भाजपची सत्ता देशभर येण्यासाठी जे जे निर्लज्जपणे करणे शक्य होते ते भाजपने केले आणि हे सर्व हिंदू हिंदुत्ववाद कार्ड खेळून मुस्लिम अल्संख्यांक विरुद्ध धर्माची नशा देशभर देऊन करत आहे. महाराष्ट्रातून त्या सरकारचे मुख्यमंत्री श्री शिंदे.. उपमुख्यमंत्री फडणवीस व इतर मंत्री यांचा ताफाच कर्नाटकला प्रचारात पाठवला. जनतेला भेडसावणारे वाढती महागाई, युवकांची बेरोजगारी आदी मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करणे ऐवजी देशाचे पंतप्रधान कर्नाटकच्या जनतेला *बजरंग बली की जय* म्हणा आणि मतदान करा असा आसंविधानिक व बालिश प्रचार करत होते. त्या विधानांवर तर सर्वोच्च न्यायालयात खेचले पाहिजे निवडणूक आचार संहितेचा तो भंग आहे.. असो ! काँग्रेस चा एवढा धसका त्यांनी घेतला आहे की ज्या काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद मिळण्यासाठी आवश्यक ते खासदारही गेल्या दोन निवडणुकात निवडून आले नाहीत, त्यांच्यावर मोदी शहा अक्षरशः तुटून पडत होते. निवडणुकीच्या आधी राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द करून टाकले. या निवडणुकीचे शेवटी शेवटी रडीचा डाव म्हणून मला 91 वेळा विरोधी पक्षाच्या लोकांनी शिव्या दिल्या असे सांगत 2019 लोकसभेचे वेळी जसा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला तसाच केविलवाणा प्रयत्न भाजपाने केला. त्यांना सार्वजनिक जीवनामध्ये ठिकठिकाणी टीका टिपणी सहन करावी लागते. तुम्ही काँग्रेसला किती शिव्या दिल्या? कितीदा हिणवले.. नेहरू ना किती शिव्या दिल्या? याचे तर पुस्तकच तयार होईल अशी समज मोदींपेक्षा निम्म्या वयाच्या प्रियंका गांधी यांना मोदी यांना समजवणी चे सुरात सांगावे लागले. शेवटी कानडी जनतेने मोदी, अमित शाह याना चारी मुंड्या चिट केले. त्यांचे सर्व कुटील डावपेच फेल झाले २/३ पेक्षा जास्त मते सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या धर्मनिरपेक्ष विचार मांडणाऱ्या काँग्रेस धर्मनिरपेक्ष जनता दल, अपक्ष यांचे पारड्यात टाकली आणि भाजपाला दक्षिण भारताचे द्वारच बंद केले. कर्नाटकच्या निवडणुकीत राष्ट्रीय योद्धा टिपू सुलतान, थोर समाज सुधारक बसव अण्णा यांचा विचारांचा हा विजय आहे
भाजपाने श्रीराम सेना बजरंग दल याना साथ देऊन हिजाब विरुद्ध वातावरण निर्माण करून कर्नाटक व देशातील वातावरण कलुषीत करण्याचे जाणीव पूर्वक प्रयत्न चालवला. ज्या द्वेष व जातीय विचारसरणी विरोधी देशाचे थोर स्वातंत्र्य सेनानी राष्ट्रपिता महात्मा गांधी, कर्नाटकात डॉक्टर कलबुर्गी व पत्रकार गौरी लांकेश, महाराष्ट्रात डॉक्टर दाभोलकर व डावे विचारवंत गोविंद पानसरे यांचे खून झाले त्या विषारी विचारसरणीचाच भाजप आरएसएस वाहक बनला आहे..
2014 पासून सत्तेवर आलेवर देशात इडी cbi चा गैरवापर करून भाजप विरोधी लोकांना नोटिसा देणे, चौकशीला बोलावणे, त्यांना भ्रष्टाचारी ठरवत असता कर्नाटकात तथाकथित विकास कामात 40 टक्के कमिशन भाजप व स्थानिक नेते कमवत होते . हेही बिंग कानडी जनतेने फोडले हे सर्व घटनांनी जनतेत भाजप आरएसएस बद्दल शिसारी निर्माण झाली आहे. आणि हीच आगामी 2024 च्या निवडणुकीत दिल्लीतील भाजप आरएसएस सरकार पराभूत करण्याची नांदी ठरणार आहे.
कर्नाटक पेक्षाही वाईट परिस्थितीत देशभर भाजप 2024चे निवडणुकीत पराभूत होईल असे आशावादी राजकीय चित्र यामुळे उभे राहीले, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने २१५ जागांवर काँग्रेसला पाठिंबा दिला आणि धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी योगदान दिले आहे.
या निवडणुकीने मोदीं अजिंक्य आहेत.. मोदींचा करिष्मा वगैरे व्यक्ती केंद्रित राजकारणाचा भ्रम ही कानडी जनतेने तोडला आहे म्हणून कानडी जनतेने भाजप आरएसएसची द्वेषाधारी, व्यक्ती केंद्रित व भ्रष्टाचारी राजकारण नाकारल्याबद्दल अभिनंदन !! आता काँगेस कडून लोकाभिमुख, सामंजस्यपूर्ण शासनाची अपेक्षा आहे. आरएसएस-भाजपने निर्माण केलेले द्वेष जनतेत निर्माण केलेली दूही भेदभाव, वेगवेगळ्या मतांचा आदर करून दूर केले पाहिजेत. २०२४ मध्ये भाजपचा मुकाबला करण्यासाठी सर्व लोकशाही धर्मनिरपेक्ष वादी पक्ष संघटना यांचे भाजप आरएसएस विरुध्द ऐक्य निर्माण झाले पाहिजे.
लडेंगे_जितेंगे.... जयभीम -लालसलाम काॅम्रेडस्....
ReplyDelete