Friday, 12 May 2023

शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष दिपाली मिसाळ यांच्या वतीने आयोजित सातवे शिबिर संपन्न !

शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष दिपाली मिसाळ यांच्या वतीने आयोजित सातवे शिबिर संपन्न !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १२ : अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नेटा डिसूजा तसेच महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सवालाखे यांच्या आदेशानुसार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या 138 व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील 115 वार्ड मध्ये "महाआरोग्य मोफत शिबिर" शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष कु. दिपालीताई लालाजी मिसाळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले. 

या आयोजित केलेल्या शहरातील 115 वार्ड मधील आज सातवे शिबिर न्याय नगर हुसेन कॉलनी या ठिकाणी वार्ड अध्यक्ष रहीम भाई यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले. या शिबिरामध्ये तपासणी पासून ते आजार संपूर्ण रित्या बरा होईपर्यंत मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. 

यावेळी  शिबिराचे उद्घाटक म्हणून माजी शहराध्यक्ष मा. इब्राहिम पठाण, महाआरोग्य शिबिराचे वैद्यकीय भागीदारी असलेले काँग्रेस प्रवक्ता डॉ. पवन डोंगरे, डॉ. सरताज पठाण, पश्चिम विधानसभा महिला अध्यक्ष  रुबीना सय्यद, प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे महासचिव हरजंदरसिंग गुलाटी, शहर जिल्हा महिला उपाध्यक्ष प्रवीण देशमुख, चक्रधर मगरे, शफिक बागवान, आदींची उपस्थिती होती. या महाआरोग्य शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे, आतापर्यंत झालेल्या सात शिबिरामध्ये जवळपास साडेसहा हजार  रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. व त्यांचा आजार संपूर्ण रित्या बरा होईपर्यंत त्यांना मोफत ट्रीटमेंट शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने दिल्या जाणार आहे.

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कोतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कोतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...