डोका येथिल अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यूचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग CID कडे देण्यात यावा* *महिला कांग्रेस कमिटीची मागणी !
यवतमाळ जिल्ह्यातील मातंग समाजातील ऊस तोडणी मजुराच्या मुलीस मौजे डोका, तालुका केज, जिल्हा बीड येथे सहा महिने शेतात डाबून ठेवून सतत अत्याचार करून तिचा छळ केल्याची क्रूर घटना उघडकीस आली असून सदरील अल्पवयीन मुलीचे प्रेत विहिरीमध्ये संशयास्पद रित्या आढळून आले आहे. या प्रकरणी पोलिसांची भूमिका ही अत्यंत संशयास्पद असून या घटनेचा तपास करण्याचा नैतिक अधिकार केज पोलिसांना राहिलेला नाही, डोका येथिल अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यूचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग *CID* | कडे देण्यात यावा अशी मागणी विभागीय आयुक्तालयांकडे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शेख यूसूफ, शहर जिल्हा महिला अध्यक्ष कु. दिपाली मिसाळ, काँग्रेस प्रवक्ता डॉ. पवन डोंगरे, महासचिव अनीस पटेल, श्रीकृष्ण काकडे, रुबीना सय्यद, मोहम्मद रईस, नंदा घोरपडे, शशिकला मगरे, चक्रधर मगरे, उत्तम दणके, विद्या लांडगे, अनुसया दणके, निर्मला शिखरे ,परविन देशमुख, जयपाल दनवे, सुनील साळवे, संजय म्हस्के, केशव नामेकर, शफिक बागवान आदींची उपस्थिती होती.
मागण्या:-
=====
१) मातंग समाजातील अल्पवयीन मुलीवार अत्याचार करणाऱ्या विरोधात ॲट्रॉसिटी चे कलम ३ (२) (v) सामाविष्ट करण्यात यावे.
२) अन्यायग्रस्त परिवाराला २५ लाख रुपयांचे आर्थिक मदत करण्यात यावी
३) केज पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात भा. द. वी. कलम ३०५ सामाविष्ट करण्यात यावे.
४) अन्यायग्रस्त परिवारास पोलीस संरक्षण देण्यात यावे तसेच परिवाराचे पुनर्वसन करण्यात यावे.
५) सामाजिक कार्यकर्त्यावर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे.
No comments:
Post a Comment