Thursday, 15 June 2023

नूतन विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव साजरा !

नूतन विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव साजरा !

*आनंदी विद्यार्थी आनंदी शाळा*

कल्याण/ठाणे (ऑनलाईन वृत्तसेवा) : दि१५, कर्णिक रोड, कल्याण येथील नूतन विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत सकाळपासून खूप प्रसन्न वातावरण होते. कारण गेल्या दीड महिन्यापासून विद्यार्थ्यांशिवाय असलेली शाळा आज पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आगमनाने फुलून गेली होती. शाळेच्या पटांगणात सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी जमले होते. सर्वप्रथम नवीन विद्यार्थांचे स्वागत ढोल वाजवून करण्यात आले. मग पटांगणातच सामूहिक प्रार्थना झाली.

ज्येष्ठ शिक्षक ज्ञानेश्वरी घुगे सर यांनी नारळ वाढवून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली. श्रद्धा चौधरी यांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे औक्षण केले. त्यानंतर सर्व विद्यार्थी शाळेच्या सभागृहात आसनस्थ झाले. त्यानंतर सरस्वती पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेची आणि शाळेतील शिक्षकांची ओळख शाळेतील सांस्कृतिक प्रमुख सौ.मिताली बोकील मॅडम यांनी करून दिली. शाळेच्या शिस्ती विषयक माहिती श्री. भागीत सर यांनी करून दिली. नंतर प्रत्येक शिक्षकाच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. शाळा प्रवेशोत्सव समारंभ बातमीलेखन शाळेच्या प्रसिद्धी प्रमुख सौ. प्राजक्ता सोनावणे तर माहिती प्रसारीत सौ. शुभांगी भोसले यांनी केली.

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...